

American Congressman Srinivas Thanedar addressing the audience at Satara Sahitya Sammelan.
sakal
सातारा : छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा), ता. १ : येथे आजपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अमेरिकेचे सिनेट सदस्य श्रीनिवास ठाणेदार हे आवर्जून उपस्थित राहिले. दुपारी निघालेल्या ग्रंथदिंडीत ते मान्यवरांसोबत सहभागी झाले. दरम्यान, इंग्रजी शिकणे कठीण नाही; पण आपली मराठी भाषा व संस्कृती सोडायची नाही. त्यातूनच आपली संस्कृती टिकून राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलांना मराठी वाचायला आणि बोलायला प्रवृत्त करायला हवे, अशी अपेक्षा अमेरिकन सिनेटचे सदस्य श्रीनिवास ठाणेदार यांनी व्यक्त केली.