UP, बिहार नाही तर हे महाराष्ट्रात घडलंय; चक्क पोलिस पत्‍नीनंच दिली पतीची सुपारी, भोसले रक्‍ताच्या थारोळ्यात..

गोळी डोक्‍यात लागल्‍याने अमित हे रक्‍ताच्‍या थारोळ्यात पडले.
Amit Bhosale Murder Case
Amit Bhosale Murder Caseesakal

सातारा : येथील शुक्रवार पेठेतील अमित आबासाहेब भोसले यांचा खून (Amit Bhosale Murder Case) पोलिस दलात असणारी पत्‍नी रागिणी हिने सराईत गुन्‍हेगारांना सुपारी देऊन केल्‍याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी (Satara Taluka Police) रागिणी अमित भोसलेसह सहा जणांना अटक केली आहे. वारंवार होणाऱ्या छळास कंटाळून या खुनाची सुपारी देण्‍यात आल्‍याची, तसेच या खुनात एका अल्‍पवयीनाचाही समावेश असल्‍याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अमित आबासाहेब भोसले यांचा राधिका रस्त्यावर जुन्‍या चारचाकी खरेदी विक्रीचा व्‍यवसाय होता. ता. २४ रोजी रात्री अमित हे मैत्रिणीसमवेत चारचाकीतून वाढेफाटा येथील हॉटेलमध्‍ये जेवणासाठी गेले होते. हॉटेलमधून मागविलेले जेवण चारचाकीत बसून केल्‍यानंतर अमित हे हात धुण्‍यासाठी जवळच असणाऱ्या नळावर गेले. याच वेळी त्‍याठिकाणी दोन युवक दुचाकीवरून आले. त्‍यांनी हात धुवून चारचाकीकडे निघालेल्‍या अमित भोसलेंवर गोळीबार केला.

गळ्यावर धारदार शस्‍त्राने वार

गोळी डोक्‍यात लागल्‍याने अमित हे रक्‍ताच्‍या थारोळ्यात पडले असतानाही हल्‍लेखोरांनी त्‍यांच्‍या गळ्यावर धारदार शस्‍त्राने वार करत पळ काढला. याची माहिती मिळाल्‍यानंतर घटनास्‍थळी दाखल झालेल्‍या पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्‍हा रुग्‍णालयात आणला. येथून अमित यांचा मृतदेह न्‍यायवैधक तपासणीसाठी पुणे येथे नेण्‍यात आला. याप्रकरणी हॉटेलचालकाने नोंदविलेल्‍या फिर्यादीनुसार, अज्ञातांवर खुनाचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्‍थानिक गुन्‍हे शाखा, सातारा तालुका पोलिस संयुक्‍तपणे करत होते. सीसीटीव्‍ही फुटेज, तसेच इतर तांत्रिक बाबींची पडताळणी करत पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयितांचा शोध सुरू केला होता.

Amit Bhosale Murder Case
BJP PM Candidate : PM मोदींनंतर CM योगी पंतप्रधानपदावर दावा करणार? स्वत: दिलं 'हे' खास उत्तर

सराईत गुन्‍हेगार वारंवार बदलत होते जागा

याचदरम्‍यान शहर परिसरातील काही सराईत गुन्‍हेगार खुनापासून बेपत्ता असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासात हे सराईत गुन्‍हेगार वारंवार जागा बदलत असल्‍याचे समोर आले. याचदरम्‍यान खुनातील एका अल्‍पवयीनासह सहा संशयित गोवा येथे मुक्कामी असल्‍याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधत एक पथक तिकडे रवाना केले. या तसेच गोवा पोलिसांनी मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे हणजून येथून पाच जणांना ताब्‍यात घेतले. या पाच जणांनी स्‍वत:ची नावे अभिषेक विलास चतुर (वय २७, रा. नांदगिरी, ता. कोरेगाव), शुभम हिंदुराव चतुर (वय २७, रा. कोरेगाव, हल्‍ली पुणे), राजू भीमराव पवार (वय २६, रा. पंताचा गोट, सातारा), सचिन रमेश चव्‍हाण (वय २२, रा. मुळशी, पुणे), सूरज ज्ञानेश्‍‍वर कदम (वय २७, रा. खेड, सातारा, हल्‍ली पुणे) अशी सांगत अमित भोसलेंचा खून सुपारी घेऊन केल्‍याची कबुली दिली.

Amit Bhosale Murder Case
Amit Bhosale Murder Case

अमितचे होते परस्त्रियांशी संबंध

सातारा येथे आणल्‍यानंतर त्‍यांनी अमित यांचा खून पत्‍नीने सुपारी दिल्‍याने केल्‍याचे सांगितले. यानुसार पोलिसांनी शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात कार्यरत असणाऱ्या रागिणी यांना ताब्‍यात घेतले. अमित वारंवार पत्‍नीकडे (Ragini Amit Bhosle) पैशाची मागणी करत असे, तसेच त्‍याचे इतर स्त्रियांशी संबंध होते. याला कंटाळूनच सुपारी देऊन अमित यांचा खून केल्‍याची कबुली त्‍यांनी दिल्‍याची माहिती पोलिस अधीक्षक शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Amit Bhosale Murder Case
Shiv Sena : माझ्या मतदारसंघातून लढून दाखवा; शिंदे गटातील बड्या नेत्याचं ठाकरेंना ओपन चॅलेंज

या कारवाईत पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक विश्‍‍वजित घोडके, सहायक निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक अमित पाटील यांच्‍या नेतृत्वाखाली पथक कार्यरत होते. यात संतोष पवार, रवींद्र भोरे, उत्तम दबडे, अतिष घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्‍मण जगधने, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, नीलेश काटकर, गणेश कापरे, मोहन पवार, मयूर देशमुख, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्‍वीराज जाधव, सचिन ससाणे, सायबरचे अजय जाधव, अमित झेंडे, अनिकेत जाधव, सुशांत कदम, सातारा तालुक्‍याचे उपनिरीक्षक ज्ञानेश्‍‍वर दळवी, राजेंद्र वंजारी, दादा परिहार, नीतीराज थोरात, सतीश पवार, सचिन पिसाळ रायसिंग घोरपडे, राहुल राऊत यांचा सहभाग होता.

Amit Bhosale Murder Case
Political News : आता निवडणुका झाल्यास शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं भाकित

अंतिम दर्शनावेळी होती हजर

खून झाल्‍यानंतर तब्‍बल २४ तासांनी न्‍यायवैधक तपासणीनंतर मृतदेह पुणे येथून ता. २५ रोजी रात्री अकराच्‍या सुमारास शुक्रवार पेठेतील घरी आणण्‍यात आला. मृतदेह आणण्यापूर्वी काही तास अगोदरच रागिणी या घरी आल्‍याची माहिती काही स्‍थानिकांनी दिली. जानेवारीच्‍या पहिल्‍या आठवड्यात खुनाचा कट रचत रागिणी यांनी विविध गुन्ह्यांतील सराईतांना एकत्र करत सुपारी दिल्‍याचेही तपासात समोर आले आहे.

Amit Bhosale Murder Case
MP Police : PFI संघटनेच्या आणखी तीन सदस्यांच्या आवळल्या मुसक्या; सरकारविरोधात रचत होते कट

सलग दहा दिवस पाठलाग

पोलिस मागावर असल्‍याने त्‍यांना चकवा देत संशयित पुणे, नगर, जळगाव, औरंगाबाद, लातूर, अलिबाग, इंदूर, उज्‍जैनसह इतर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत ठावठिकाणा बदलत होते. सलग दहा दिवस त्‍यांच्‍या ठावठिकाणांचा शोध घेणाऱ्या पोलिसांना ते गोवा येथे असल्‍याची शेवटची माहिती मिळाली. यानुसार कारवाई करत त्‍या संशयितांना ताब्‍यात घेण्‍यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com