महाविकास आघाडीतील "हे' मंत्री म्हणतात, पृथ्वीराज चव्हाणांचे स्वप्न पूर्ण करू

Satara
Satara

वाई (जि. सातारा) : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा येथे मंजूर केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पृथ्वीराज चव्हाण यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली. 

खंडाळा येथे झालेल्या कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत कॉंग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या वतीने युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी मंत्री अमित देशमुख यांना निवेदन देऊन सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम तातडीने सुरू करण्याबाबतची मागणी केली.

श्री. शिंदे यांनी निवेदनात म्हटले, की पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना सातारा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाली होती. हे महाविद्यालय कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागेत आरक्षित केले आहे. ही जागा कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा येथे मंजूर केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे काम आपण लवकरात लवकर सुरू करून त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करू, अशी ग्वाही श्री. देशमुख यांनी दिली.

या वेळी नितीनकुमार भरगुडे- पाटील, रतनसिंह शिंदे, गुरुदेव बरदाडे, नंदकुमार खामकर, राजेंद्र नेवसे, अशोकराव धायगुडे, युवराज ढमाळ, शैलेश गाढवे, प्रमोद अनपट, यशवंतराव चव्हाण, संदीप साळुंखे, अतुल पवार, मनोज पवार, हर्षवर्धन भोसले, रवींद्र ढमाळ, जितेंद्र खंडागळे, बंटी बरदाडे, सचिन वायदंडे, रमेश शिंदे व कॉंग्रेसचे व युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

महत्त्वाचे प्रश्‍न सोडविण्याची विनंती 

सातारा जिल्हा दौऱ्यावर वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख हे आलेले असताना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी त्यांच्याकडे जिल्ह्यातील काही महत्त्वाचे प्रश्‍न मांडून ते सोडविण्याची विनंती केली. 

शिक्षकांना 12 नको, आठ तास हवी ड्युटी, चेकपोस्टवर बिघडते आरोग्य 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com