
कवठे : पुणे-बंगळूर महामार्ग रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या वडाच्या झाडांवर कुऱ्हाड चालविण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय वेळे ग्रामपंचायतीने घेतला आहे. कामामुळे बाधित झालेल्या हजारो झाडांचे यशस्वी पुनर्रोपण करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या नाम फाउंडेशनने या वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर झाडांना नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे.