
सातारा: आजच्या युगात कोणालाच कोणासाठी वेळ नाही, हे आपण पाहतो. अशा स्थितीत एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याचे प्रकारही अगदी विरळ होत आहेत; परंतु आपल्या दिनचर्येतला, संपर्कातला एखादा सहकारी एखाद्या समस्येत अथवा आजारपणात अडकला असेल, तर त्याला प्राधान्याने मदत करण्याचा विचार जपणारे लोकच समाजात खरे माणुसकीची फुंकर घालणारे ठरतात. याचाच प्रत्यय अंदोरी (ता. खंडाळा) येथील वर्तमानपत्र विक्रेते राजेंद्र दगडे यांनी त्यांच्या आजारपणाच्या निमित्ताने घेतला.