Aditi Tatkare Sakal
सातारा
आनंदाची बातमी! 'अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन': मंत्री आदिती तटकरेंची विधान परिषदेत घाेषणा
Anganwadi Workers’ Long-Standing Demand Fulfilled : अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे व किमान वेतनापेक्षा कमी असल्याने त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च २०२५ या महिन्याचे मानधन अद्यापि त्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याचे मे २०२५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे.
सातारारोड : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युइटी देण्याच्या प्रस्तावांबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यासंदर्भातील माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील उत्तरात त्यांनी विधान परिषदेत दिली.