
सातारा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाची सूत्रे आज अनिस नायकवडी यांनी हाती घेतली, तसेच शिक्षणाधिकारी (योजना) या विभागाचाही पदभार शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी स्वीकारला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे आदी उपस्थित होते.