

“Tadoba tigress relocated to Sahyadri; now safely settled in Chandoli’s Sonarli forest range.”
Sakal
कऱ्हाड : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आणखी एका वाघिणीचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतर यशस्वी झाले. सह्याद्री वाघ पुनर्स्थापन कार्यक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोअर रेंजमध्ये पकडलेल्या वाघिणीचे सह्याद्रीच्या जंगलात स्थानांतर झाले आहे. ताडोबातील वाघीण छोटी तारा वाघिणीची ती मुलगी असून, तिचे वय साधारणपणे दोन वर्षांचे आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारली अनुकूलन कुंपणात तिला सोडण्यात आले आहे.