भर बाजारपेठेत सरपंचांनी लाच स्विकारली, फसल्या जाळ्यात

सिद्धार्थ लाटकर
Friday, 23 October 2020

भर बाजारपेठेत ही कारवाई झाल्याने सरपंच या चर्चेचा विषय ठरल्या. महिला सरपंच यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अटक केली. आज (शुक्रवार) त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सातारा : दुंद (ता. जावली) ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाने बंदिस्त गटारीचे काम झाल्यानंतर ठेकेदाराकडून बिलातील टक्केवारीचे पाच हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मेढा बाजारपेठेत करण्यात आली. आज (शुक्रवार) सरपंच यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

लक्ष्मी सीताराम गोरे (वय 39, रा. दुंद) असे संशयित महिला सरपंचाचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे ठेकेदार आहेत. तक्रारदार यांनी दुंद गावचे बंदिस्त गटाराचे काम केले आहे. काम झाल्यानंतर त्यांना त्यांचे कामाचे बिल मिळाले. मिळालेल्या बिलातील टक्केवारी प्रमाणे महिला सरपंच यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. संबंधित ठेकेदाराने लाचेची मागणी झाल्याने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.

दांपत्याची आळवणी दारातूनच  : घेईल मानून अंबाबाई... आता तरी जावी रोगराई! 

सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची खातरजमा केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी लाचेची रक्कम मेढा येथे घेण्याची ठरली. महिला सरपंच यांचे मेढा येथे भाजीचे दुकान आहे. याठिकाणी पैसे स्वीकारताच सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

साखरगडावर यंदा यमाईदेवीच्या पादुकांचे दर्शन

भर बाजारपेठेत ही कारवाई झाल्याने सरपंच या चर्चेचा विषय ठरल्या. महिला सरपंच यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अटक केली. आज (शुक्रवार) त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anti Corruption Officers Arrested Sarpanch Accepting Bribe Satara News