Anushka Gurav Success Story : अंगणवाडी सेविकेची लेक थेट अमेरिकेत! मसूरच्या अनुष्का गुरवची आंतरराष्ट्रीय कंपनीत 'सॉफ्टवेअर इंजिनिअर' म्हणून निवड, सिस्को कंपनीत मिळवले मोठे पॅकेज
Anushka Gurav Cisco software engineer selection news : मसूर येथील अनुष्का सदानंद गुरव हिची सिस्को या बहुराष्ट्रीय कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली. डिप्लोमामध्ये ९५ टक्के गुण मिळवणाऱ्या अनुष्काच्या यशामुळे परिसरातून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मसूर : मनात जिद्द, कष्टाची तयारी आणि चिकाटी असेल, तर परिस्थिती कशीही असली तरी यशाचे उत्तुंग शिखर गाठता (Anushka Sadanand Gurav) येते, हे मसूर (ता. कऱ्हाड) येथील अनुष्का सदानंद गुरव हिने सिद्ध करून दाखवले आहे.