Apmc Election : फक्त एकच मताने गुरव विजयी झाल्याने संबंधित जागेच्या मतांची फेर मतमोजणी

ग्रामपंचायतच्या चार जागांची मतमोजणी सध्या सुरू आहे
मतमोजणी
मतमोजणी sakal

कराड : कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी गटातील इतर मागास प्रवर्गातील स्वर्गीय विलासराव पाटील काका रयत पॅनलचे सर्जेराव गुरव यांना 922 मते मिळाली आहेत तर शेतकरी विकास पॅनलचे फिरोज इनामदार यांना 921 मते मिळाली आहेत. केवळ एकच मताने गुरव विजयी झाल्याने शेतकरी विकास पॅनलने संबंदीत जागेच्या मतांची फेर मतमोजणी मागवली आहे.

दरम्यान ग्रामपंचायतच्या चार जागांची मतमोजणी सध्या सुरू आहे. कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा सामना झाला. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपचे कार्यकारणी सदस्य अतुल भोसले यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणुक बनली होती. बाजार समितीच्य रयत पॅनलला 8 तर शेतकरी विकास पॅनलला 6 जागा मिळाल्या आहेत.

विजय उमेदवार व मिळालेली मते

शेतकरी विकास पॅनेल  : सोसायटी गटातील सर्वसाधारण प्रवर्ग - जगदीश जगताप    900

  • मानसिंगराव जगदाळे 891

  • दयानंद पाटील 900

  • उध्दवराव फाळके 898

  • विनोद जाधव 907

महिला प्रवर्ग - 

  • रेखाताई पवार 926

  • ग्रामपंचायत गट -

  • सर्वसाधारण प्रवर्ग -

  • मानसिंग पाटील

  • प्रदीप शिंदे

अनुसूचित जाती- जमाती

  • अंकुश हजारे

  • आर्थिक दुर्बल घटक

  • आनंदराव मोहिते

  • (स्व) लोकनेते विलासराव पाटील काका रयत पॅनेल

  • सोसायटी गट सर्वसाधारण प्रवर्ग

सर्वसाधारण प्रवर्ग -

  • विजयकुमार कदम 886

  • दिपक (प्रकाश) पाटील 898

  • महिला प्रवर्ग

  • इंदिरा जाधव-पाटील 914

  • इतर मागास प्रवर्ग

  • सर्जेराव गुरव 922

विमुक्त जाती भटक्या जमाती गट

  • संभाजी काकडे 924

  • ग्रामपंचायत गट

  • सर्वसाधारण प्रवर्ग

  • संभाजी चव्हाण

  • राजेंद्र चव्हाण

आर्थिक दुर्बल घटक प्रवर्ग

  • शंकर इंगवले

  • अनुसूचित जाती- जमाती प्रवर्ग

  • नितीन ढापरे

  • व्यापारी अडते गट

  • जयंतीलाल पटेल 259

  • जगन्नाथ लावंड 255

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com