esakal | 'जलसुरक्षा' अध्यक्षपदी चंद्रकांत दळवी; शासनाकडून 15 तज्ज्ञांची समिती स्थापन

बोलून बातमी शोधा

Chandrakant Dalvi
'जलसुरक्षा' अध्यक्षपदी चंद्रकांत दळवी; शासनाकडून 15 तज्ज्ञांची समिती स्थापन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विसापूर (सातारा) : इयत्ता नववी आणि दहावीसाठी पायाभूत विषयांबरोबरच अनिवार्य श्रेणी विषयासाठी राज्य शासनाने "जलसुरक्षा' या विषयाची निवड 2020- 21 पासून केली आहे. हे पुस्तक तयार करण्यासाठी शासनाने 15 तज्ज्ञांची विषय समिती स्थापन केली आहे. निढळचे सुपुत्र व माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची या विषय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या विषय समितीने "जलसुरक्षा' या विषयाचे इयत्ता नववीसाठीचे पुस्तक तयार केले असून, 2020- 21 वर्षापासून माध्यमिक शिक्षणामध्ये या पुस्तकाचा समावेश केला आहे. इयत्ता दहावीसाठी याच विषयाचे पुस्तक तयार करण्याचे काम सुरू असून, 2021-22 पासून त्याचा समावेश इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात केला जाणार आहे.

क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक पदांच्या 320 जागांसाठी बंपर भरती; 'असा' भरा अर्ज

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्येच "पाणी' याविषयी संपूर्ण माहिती व्हावी म्हणून जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापन आणि जलगुणवत्ता इत्यादी बाबींचा समावेश या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांबरोबरच पालक आणि नागरिकांनाही "पाणी' या विषयाचे विविधांगी ज्ञान या पुस्तकाच्या वाचनातून मिळू शकेल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केली.

Edited By : Balkrishna Madhale