esakal | माजी आमदार प्रभाकर घार्गेंवर अटक वॉरंट; पडळ खूनप्रकरण भोवणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Crime

माजी आमदार प्रभाकर घार्गेंवर अटक वॉरंट; पडळ खूनप्रकरण भोवणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : पडळ (ता. खटाव) येथील साखर कारखान्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेप्रकरणी माजी आमदार व कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे (Prabhakar Gharge) यांनी दाखल केलेला मुदतवाढीचा अर्ज न्यायालयाने नामंजूर करून त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख यांनी दिली. (Arrest Warrant Issued Against Prabhakar Gharge Satara Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडळ येथील खुनाच्या तपासासाठी वडूज पोलिस ठान्यात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणी सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील संशयित प्रभाकर देवबा घार्गे (रा. पळशी, ता. खटाव) यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाने ते 29 एप्रिल रोजी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत (ता. 6) दिलासा देऊन शुक्रवारीपर्यंत (ता. 7) न्यायालयात समक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यावर श्री. घार्गे यांनी आज न्यायालयात समक्ष हजर न राहता मुदतवाढीचा अर्ज दाखल केला. तो अर्ज न्यायालयाने नामंजूर करून त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले.

मी कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही, मीही 96 कुळी मराठाच : शशिकांत शिंदे

Arrest Warrant Issued Against Prabhakar Gharge Satara Crime News

loading image
go to top