esakal | आयुष्याकडं सकारात्मक दृष्टीनं पाहण्यासाठी पुस्तकं खूप मदत करतात : डॉ. राजेंद्र माने

बोलून बातमी शोधा

World Book Day
आयुष्याकडं सकारात्मक दृष्टीनं पाहण्यासाठी पुस्तकं खूप मदत करतात : डॉ. राजेंद्र माने
sakal_logo
By
सुनील शेडगे

नागठाणे (सातारा) : 23 एप्रिल अर्थात जागतिक पुस्तक दिन! माणसाचे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध, संपन्न करणाऱ्या पुस्तकांना स्मरण्याचा हा दिवस. यंदा मात्र कोरोनाजन्य परिस्थितीचे सावट या दिवसावर आहे. राज्यासह जिल्ह्यातील ग्रंथालये अद्यापही बंद स्थितीत आहेत. त्यातून वाचनप्रेमींची पुस्तकांची आस कायम आहे.

वाचन चळवळीतील 23 एप्रिल हा महत्त्वपूर्ण दिवस. जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्‍सपिअर यांचा हा जन्मदिवस अन्‌ मृत्यूदिवस देखील. जगभर तो पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो. जिल्ह्याच्या साहित्य प्रांतालाही भरीव परंपरा लाभली आहे. कविवर्य बा. सी. मर्ढेकर, कवी यशवंत, कवी गिरीश यांसारखे दिग्गज याच भूमीतले. ग्रंथोत्सवासारखा जिल्ह्याचा साहित्यिक उत्सव राज्यभर अनुकरणीय बनला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून पुस्तकदिनावर कोरोनाचे सावट पडले आहे. गेल्या वर्षी मार्चच्या मध्यापासून जिल्ह्यातील सर्व ग्रंथालये बंद झाली. ती सुरू व्हायला ऑक्‍टोबर महिना उजाडावा लागला. सारे काही सुरळीत होईल, अशी आशा असतानाच यंदा पुन्हा एकदा ग्रंथालयांवर बंदची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे वाचनप्रेमींत निराशेचे वातावरण आहे.

क्रेडिट कार्डवर कर्ज घेताय? मग 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठे नुकसान

ग्रंथालय अनुदान, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट होत चालला असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय संघाच्या कार्यवाह ग्रंथमित्र नंदा जाधव यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. वाचनाची भूक मोबाईलवर भागविण्याकडे सध्या वाचकांचा कल दिसतो. मोबाईलवरून ब्लॉग्ज, सोशल मीडियावरचे लेखन, तसेच ई-बुक्‍सच्या वाचनाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. गाजलेल्या पुस्तकांच्या पीडीएफही सहजपणे उपलब्ध होत आहेत. अर्थात याची सर मात्र पुस्तकांना नाही, हेही तितकेच खरे.

आयुष्याकडे, जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहाण्यासाठी पुस्तके नक्कीच मदत करतात. सध्याच्या निराशाजनक परिस्थितीत पुस्तकांचे महत्त्व अमूल्य आहे. कोरोनामुळे वाचन चळवळ दोन पावले मागे गेली आहे. स्वतंत्र नियमावली तयार करून ग्रंथालये सुरू करण्यास परवानगी मिळायला हवी.

-डॉ. राजेंद्र माने, ज्येष्ठ साहित्यिक

माझे लग्न 26 एप्रिलला आहे, मला पळवून न्या.. तुमची पुष्पा, आय लव्ह यू

जिल्ह्यातील ग्रंथालयांची स्थिती

वर्ग संख्या कर्मचारी

  • 'अ' वर्ग 09 038

  • 'ब' वर्ग 62 186

  • 'क' वर्ग 158 316

  • 'ड' वर्ग 166 166

  • एकूण 395 706

Edited By : Balkrishna Madhale