esakal | माझे लग्न 26 एप्रिलला आहे, मला पळवून न्या.. तुमची पुष्पा, आय लव्ह यू

बोलून बातमी शोधा

Twenty Ruppee Viral Note

माझे लग्न 26 एप्रिलला आहे, मला पळवून न्या.. तुमची पुष्पा, आय लव्ह यू

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : पुर्वीच्या काळी प्रेमीयुगल कबुतराच्या पायावर प्रेमाची पत्र बांधून एकमेकांना संदेश पाठवयाचे असे सांगितले जात. मैने प्यार किया या चित्रपटात तर संदेशवहनाचे काम कबूतर करीत असल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहेच. कबूतर बरोबर प्रियकराचा प्रेम संदेश प्रियसी पर्यत पोचवत असे आपल्या कानावर देखील नेहमी पडत.

काळ बदलला तशी संदेश पोहचविण्याची साधनं देखील बदलली. आत्ताच्या युगात तर निरोप देण्यासाठी माेबाईलचा वापर हाेत आहे. परंतु एखादा खास निराेप द्यायचा असेल तर अनेक जण वेगवेगळ्या आयडिया करतात. अशी एक आयडिया म्हणजे पैशांच्या नोटेचे प्रेम संदेशाठीचा वापर केला गेला आहे.

खरंतर अशी उदाहरण आपण यापुर्वीच पाहिली देखील आहेत. प्रेमाचे अभिव्यक्ती असो किंवा व्यभिचाराचे दु: ख असो, सर्व काही नोटेवर लिहिले जात आहे. काही दिवसांपूर्वी 'सोनम गुप्ता बेवफा है' कशी लिहिलेली नोट जबरदस्त व्हायरल झाली होती. आता पुन्हा एकदा असेच घडले आहे. यावेळी ते द्वेषातून नव्हे तर प्रेमातून आहे. विशेष म्हणजे लिहिणारी युवती आपल्या प्रियकरासमवेत ठरलेले लग्न तोडून पळून जाण्यास तयार असल्याचा निश्‍चय केला आहे.

सध्या 20 रुपयांची नोट इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या नोटेवर पुष्पाने दीपूसाठी एक प्रेमळ संदेश लिहून मला पळवून न्या असे म्हणत आहे. पुष्पाने नोटेवर लिहिलेय, "प्रिय दीपू जी. माझे 26 एप्रिलला आहे. मला पळवून न्या. तुमची पुष्पा, आय लव्ह यू''

आपल्या प्रेमात दूसरे कोणीही नको म्हणून पुष्पाने नोटेवर व्यक्त केलेली भावना दिपू पर्यंत पोचविण्यासाठी सध्या नेटीझन्स प्रयत्न करीत आहेत. काही नेटीझन्स म्हणतात पुष्पा नावाची एक मुलगी आहे जिचे 26 एप्रिलला लग्न होणार आहे पण तिला आपला प्रियकर दीपूसमवेत लग्न करायचे आहे. त्यामुळे ती लग्नापुर्वीच तिला पळवून न्यायला सांगत आहे. या प्रेमाच्या संदेशाचं वास्तव काय आहे हे आम्हांला ही माहिती नाही, पण ही 20 रुपयांची नोट आणि त्यावर लिहिलेले संदेश हा इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामाध्यमातून ती कदाचित दिपूला भेटेलही.

काळजी करु नका;गिर्याराेहक प्रियांकाने घेतला महत्वपुर्ण निर्णय

तांबवेतील नंदकिशोरचा राजधानीत झेंडा; दिल्लीत पहिल्याच प्रयत्नात 'यश'

दहावी :"कोरोना बॅच' शिक्का पडण्याची भिती