esakal | 'शासनाकडून भिक नको, कलेची उपासना करण्याची परवानगी द्या'
sakal

बोलून बातमी शोधा

Artists

दीड वर्षांपासून नाट्यगृहे, सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ आलीय.

'शासनाकडून भिक नको, कलेची उपासना करण्याची परवानगी द्या'

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : दार उघडा हो मायबाप सरकार, नाट्यगृहाचे (Theater) दरा उघडा.., सांस्कृतिक, पारंपरिक लोककलेचे कार्यक्रम सुरु करा, अशी विनवणी करत आज कऱ्हाड (जि. सातारा) येथील कलाकारांनी शासनाला साद घातली. दीड वर्षापासून नाट्यगृहे, सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ आलीय. त्यातून वाचण्यासाठी आम्हाला शासनाकडून (Maharashtra Government) भिक नको, मात्र कलेची उपासना करण्याची परवानगी मिळावी, अशी विनवणी कलाकारांनी आज केली.

येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात कलाकारांनी एकत्र येत नटराजाची आरती केली. त्यानंतर शासनाला नाट्यगृहे, सांस्कृतिक कार्यक्रम (Cultural Events) सुरु करण्याचे आर्त विनवणी केली. यावेळी जुगलकिशोर ओझा, नितीन बनसोडे-करवडीकर, कला दिग्दर्शक वासू पाटील, ओंकार आपटे, प्रदीप हर्षे, प्रशांत कुलकर्णी, नाट्य विक्रेते प्रमोद गरगटे, सुनिल परदेशी यांच्यासह कलाकार उपस्थित होते.

हेही वाचा: चर्चा तर होणारच! जिल्हा बँकेचं राजकारण तापलं; BJP-NCP आमदार एकत्र?

सध्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आहे, त्यांच्या घरातील एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या अंत्यसंस्कारासाठीही पैसे नाहीत, जगण्याचीही आबाळ झाली आहे, त्याकडे सरकारनं लक्ष द्यावं, अशा व्यथा मांडून सरकारला हे कार्यक्रम सुरु करण्यासाठी तातडीने परवानगी द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

loading image
go to top