Asha Workers: सातारा जिल्ह्यातील आशा सेविक आक्रमक! 'प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले'; 'झेडपी'समोर आंदोलन
आशांना आरोग्यवर्धिनीचा मोबदला मिळावा, सर्वेक्षणाचा मोबदला देण्याची, मातृ वंदना योजनेचे साहित्य देण्याची, आशांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्याची, अतिरिक्त कामांसाठी दबाव न टाकण्याची, जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
सातारा : प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी आशा सेविकांनी आंदोलन केले. आंदोलनावेळी मागण्यांबाबतचे निवेदन आंदोलकांनी जिल्हा परिषद प्रशासनास दिले.