
सातारा : नगरपालिकांच्या निवडणुकीत उमेदवार देण्याबाबत कोअर कमिटी आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष यांचा अधिकार आहे. ज्या ठिकाणी भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी व नेते असतील, त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे मत सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दरम्यान, पाटणमधील झालेला पक्षप्रवेश हा पालकमंत्र्यांची कोंडी करण्यासाठी घेतला नाही. मंत्री देसाई हे आमच्या महायुतीचे अनुभवी नेते असून, त्यांना अडचणीत आणण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.