

Satara Woman Ashwini More Selected as Additional Executive Officer at Mahanirmiti After PhD and NET SET Success
esakal
-सुधीर जाधव
सातारा : प्रतिकूल परिस्थितीसमोर हार न मानता जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर गोडोली येथील अश्विनी सुरेश मोरे यांनी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांची महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित अर्थात महानिर्मितीमध्ये अतिरिक्त कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे.