Rutuja Pisal Hockey Gold : मॅकेनिकाची लेक देशासाठी ठरली 'सुवर्णकन्या'; ऋतुजाच्या झंझावाती खेळाने उंचावली भारताची मान, चीनविरुद्धच्या सामन्यात गाजवलं मैदान

Rutuja Pisal’s Gold Medal Achievement : कोळकीच्या ऋतुजा पिसाळने भारतीय महिला हॉकी संघासोबत आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. संपूर्ण स्पर्धेत सात गोल करत तिने ४४ वर्षांनंतरच्या ऐतिहासिक विजेतेपदात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
women hockey gold medal

women hockey gold medal

esakal

Updated on: 

नागठाणे : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाज साहिल जाधवच्या सुवर्ण यशानंतर आज सायंकाळी भारतीय महिला हॉकी संघाने केलेल्या अव्वल कामगिरीत कोळकीची (ता. फलटण) सुकन्या ऋतुजा दादासाहेब पिसाळ हिची कामगिरीही उल्लेखनीय (Rutuja Pisal Hockey) ठरली. त्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात यावेळच्या स्पर्धेने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेपासून खेळाचा श्रीगणेशा करणाऱ्या आणि क्रीडा प्रबोधिनीतून भारतीय महिला हॉकी संघात स्थान मिळविणाऱ्या ऋतुजाच्या कामगिरीने कोळकीसह जिल्हाही आनंदून गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com