वारूंजीच्या पंचायत समिती सदस्यासह 10 जणांवर मारहाणीचा गुन्हा | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

वारूंजीच्या पंचायत समिती सदस्यासह 10 जणांवर मारहाणीचा गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड - खासगी आर्थिक व्यवहारावरून आर्किटेक्टसह अन्य दोघांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांच्यासह सुमारे १० जणांवर शहर पोलिसात गुन्हा नोंद झाला. आर्किटेक्ट जितेंद्र पारसमल भंडारी (रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंचायत समितीचे सदस्य पाटीलसह मुकूंद पाटील, बाळासाहेब पाटील, राजू (सर्व रा. वारुंजी) यांच्यासह सहाजणांवर गुन्हा नोंद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्क्टीटेक्ट भंडारी यांची पार्श्व आर्किटेक्ट फर्म आहे. २०१०-११ मध्ये भंडारी व पाटील यांची ओळख झाली. त्यानंतर दोघांचे व्यवहार झाले. त्या फर्मतर्फे भंडारी यांनी पाटील यांच्या बारा वेगवेगळ्या प्रकल्पावर काम केले आहे. त्यांच्या गावातील कुसुमावली वाडा घराचेही काम भंडारी यांनी केले. सत्यजित ग्रुपतर्फे हॉटेल, मॉलसह अपार्टमेंटचे काम करायचे काम २०१८ साली सुरू झाले. त्यामुळे सत्यजीत ग्रुप आणि भंडारी यांच्या पार्श्व आर्किटेक्टमध्ये करार झाला. कामही सुरू झाले. २०२० मध्ये तेच काम बाळासाहेब पाटील यांचा मुलगा नयनतर्फे केले जाणार असल्याचे सत्यजित ग्रुपने सांगितले. आम्ही तुमचे कसलेही पैसे आम्ही देणे लागत नाही, असे भंडारी यांना ई मेलद्वारे कळविले. मात्र भंडारी यांनी सत्यजीत ग्रुपला १६ लाख २५ हजार रुपये येणे बाकी असल्याची नोटीस पाठविली. मात्र, त्यांनी ती स्विकारली नाही. त्याबाबत मध्यस्थी करून त्यावर तोडगा काढण्याची प्रयत्न सुरू होता.

हेही वाचा: खटावला ट्रॅक्टर की कपबशी मारणार उसळी राष्ट्रवादीचे निष्ठावंत घार्गे - मोरे आमने सामने

बुधवारी, (ता. १७) त्याबाबत मध्यस्थी करण्यासाठी वारुंजीतील सत्यजित पतसंस्थेच्या कार्यालयात बैठक झाली. त्यासाठी जितेंद्र भंडारी, त्यांचा भाऊ संजय व मित्र नितीन छाजेड तिघेजण सत्यजित पतसंस्थेत गेले. बैठक सुरू असताना संजय भंडारी यांनी पाटील यांना तुम्ही आम्हाला दहा लाख रुपये दिले असल्याचे सांगीतले. १३ लाख दिल्यावरून वाद झाला. त्याचे पर्यावसन मारहाणीत झाले. जितेंद्र भंडारी, संजय भंडारी व नितीन छाजेड यांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी खुर्च्यांनी मारहाण पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली, अशी फिर्याद दिली आहे. त्या मारहाणीत जितेंद्र भंडारी जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

loading image
go to top