खटावला ट्रॅक्टर की कपबशी मारणार उसळी राष्ट्रवादीचे निष्ठावंत घार्गे - मोरे आमने सामने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

खटावला ट्रॅक्टर की कपबशी मारणार उसळी राष्ट्रवादीचे निष्ठावंत घार्गे - मोरे आमने सामने

औंध : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हाय व्होल्टेज ठरलेल्या खटाव मध्ये प्रभाकर घार्गे यांचा 'ट्रॅक्टर' की नंदकुमार मोरे यांची 'कपबशी' उसळी मारणार..? मतदारांच्या पडद्यामागील प्लस-मायनस हलचालींमुळे निवडणूक अटीतटीची बनली आहे. उमेदवार घार्गे यांचे पाठीराखे ठरलेले निमसोड चे रणजितसिंह देशमुख तर मोरे यांच्यासाठी पाठीराख्या ठरलेल्या औंधच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी प्रतिष्ठेची बनवल्याने निमसोड व औंध ही सत्ताकेंद्रे किंगमेकर बनली आहेत.ओबीसी गटातून एक संचालक पद मिळण्याची शक्यता वाढल्यामुळे खटाव तालुक्यास दोन संचालकांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

प्रभाकर घार्गे यांना एकवेळ काँग्रेसतर्फे तर दोन वेळा राष्ट्रवादी तर्फे जिल्हा बँकेचे संचालक पद मिळाले तसेच विधान परिषदेचे आमदार पद राष्ट्रवादीच्या कोट्यातून लाभले आहे. खटाव माण साखर कारखान्याची ही उभारणी झाली आहे. दानशूर लक्ष्मीपुत्र म्हणून सुपरिचित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही कार्यक्रम असो किंवा एखादा कार्यकर्ता अडचणीत असो सदैव आपली जबाबदारी हसत मुखाने लीलया पेलणारे घार्गे जनतेचा 'आपला माणूस' म्हणून ओळखले जातात.

आमचं ठरलंय टीमचे प्रमुख साथीदार प्रभाकर घार्गे यांच्या अडचणीच्या काळात संपूर्ण ताकदीनिशी उभे राहून देशमुख यांनी प्रचाराची धुरा खांद्यावरती घेतली आहे घार्गे यांना जाणीवपूर्वक सातारा- कळंबा जेल दाखवण्याची विरोधकांची खेळी हाणून पाडली आहे.माजी आमदार डॉ दिलीप येळगावकर यांची खंबीर साथ लाभत आहे. शेतकऱ्यांची जोडलेली नाळ आणि निष्ठावंत मतदार त्यामुळे विजयाची खात्री असल्याचे देशमुख व घार्गे समर्थक सांगत आहेत .

सुवर्णपुत्र व व्यवसायिकता नसा नसात असणारे नंदकुमार मोरे अपवाद वगळता नेहमीच यशस्वी ठरले आहेत .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पंचायत समितीचे उपसभापती, सभापती, महिला बालकल्याण सभापती, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य ,आदी पदांची संधी लाभली आहे.

हेही वाचा: अकोला : सभापती निवडणुकी विरोधात पुढील सुनावणी ३० नोव्हेंबरला

खटाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या विशेष सूचनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचा अधिकृत उमेदवार तरुण चेहरा म्हणून नंदकुमार मोरे यांची वर्णी लागली. सोबत प्रभाकर देशमुख, प्रदीप विधाते, सुरेंद्र गुदगे, बंडा गोडसे, संदीप मांडवे, जितेंद्र पवार, शशिकला देशमुख, आदी दिग्गज नेतेमंडळी विजयश्री खेचून आणण्यासाठी दिवस रात्र झटत आहेत. धक्कादायक विजय मिळवून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य ठेवणार असल्याचे गायत्री देवी पंतप्रतिनिधी व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगत आहेत.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी झालेल्या ध्रुवीकरणामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीत दूरगामी परिणाम दिसून येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा: "हा शेतकऱ्यांचा विजय आहे", मोदींच्या घोषणेवर मलिकांची प्रतिक्रिया

खटाव सोसायटी मतदार संघासाठी एकूण 103 मतदार आहेत . त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नंदकुमार मोरे यांना 50 ते 55 मतांची आघाडी घेणार असल्याचा दावा राष्ट्रवादी समर्थकांकडून करण्यात येत आहे .

विरुध्द खटाव विकास आघाडी मध्ये घार्गे - 35, देशमुख -17, येळगावकर -15 अशी एकूण 67 ते 72 मातांच्या निर्विवाद आघाडीने विजयश्री आमचाच होणार असल्याचा दावा प्रभाकर घार्गे समर्थक करीत आहेत.

आ.गोरे यांची चाण्क्य चाल...

एक तरी गोरे बँकेत संचालक राहणार आहे. अर्ज माघार घेण्याची खेळी आणि विधानसभेची बेरीज एकाच वेळी साधल्याची राजकीय चर्चा दिसून येत आहे.

loading image
go to top