
सातारा : संगममाहुली (ता. सातारा) येथे प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांच्या राजा शिवछत्रपती चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सहायक कलाकार कृष्णा नदीपात्रात बेपत्ता झाला आहे. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमच्या वतीने रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात येत होता. सौरभ शर्मा (वय २८, रा. घाटकोपर पश्चिम, मूळ रा. राजस्थान) असे बेपत्ता झालेल्या कलाकाराचे नाव आहे.