भरदिवसा शेतकऱ्यांसमोरच बिबट्याचा शेळीवर हल्ला

बिबट्याचा वावर
बिबट्याचा वावर
Updated on
Summary

बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे त्या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

ढेबेवाडी (सातारा): डोळ्यादेखत शेळीला पळवून नेण्याचा बिबट्याचा प्रयत्न तेथे उपस्थित नागरिकांनी हाणून पाडला. मात्र, झटापटीत शेळीचा मृत्यू झाला. मराठवाडी (ता. पाटण) जवळच्या शिवारात काल दुपारी साडेबाराच्या सुमारास हा थरार प्रकार घडला. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे त्या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्याचा वावर
सातारा : अनैतिक संबंधातून पत्नीसह प्रेयसीचा काढला काटा

याबाबत प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडी येथील विलास चंद्रू शिंदे यांनी काल सकाळी नेहमीप्रमाणे जनावरे गावाजवळच्याच माळ नावाच्या शिवारात चरण्यास सोडलेली होती. तेथेच गवतात खुंटी ठोकून दोरीने शेळीला बांधले होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास जवळच्याच झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक बेसावध शेळीवर झडप टाकून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी जवळच असलेल्या अजय शिंदे, आबासाहेब सुतार, आनंद शिंदे, श्री. कदम आदींनी तिकडे धाव घेऊन बिबट्याला जोरदार प्रतिकार करत त्याच्या तावडीतून शेळीला सोडविण्याचा प्रयत्न केला.

बिबट्याचा वावर
'प्रवीणच्या कुटुंबीयांना सातारा सोडण्याची वेळ येवू देणार नाही'

काही वेळानंतर शेळीला तेथेच सोडून बिबट्याने डोंगराकडे धूम ठोकली. मात्र, तत्पूर्वीच बिबट्याशी झालेल्या झटापटीमुळे शेळीचा मृत्यू झाला होता. वनपाल सुभाष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बिबट्याचे हल्ले वाढल्याने शिवारात शेतीच्या कामानिमित्त आणि जनावरांना चरण्यास घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Witnesses Unusual Shiv Sena Protest Over Price Rise and Fuel Hike
Electric Shock Claims Life of Farmer During Pump Installation in Satara District
Political Ideology: RSP Chief Mahadev Jankar Reaffirms Commitment to Shahu-Phule-Ambedkar Legacy
Eyes on Loan Waiver Rules: State Government Preparing New Relief Plan for Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com