

मसूर : अनेक वर्षे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचाराने काम करणारे मतदारसंघासह जिल्ह्यात अनेक जण आहेत. त्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले.