
मेढा : वाटांबे (ता. जावळी) गावच्या हद्दीत मागील आठवड्यात रात्री सिकंदर इस्माईल मोमीन, मुसा इस्माईल मोमीन (दोघे रा. चाफळ, ता. पाटण) यांना मारहाण करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी मेढा पोलिसात गुन्हा दाखल असलेल्या विनोद रामचंद्र तुपे (रा. वडोली भिकेश्वर, ता. कऱ्हाड) व त्याचा साथीदार प्रफुल्ल मोहन पटेल (रा. वाघेरी, ता. कऱ्हाड) या दोघांना ताब्यात घेतले आहे.