

Education Is the Key to Freedom for Nomadic Tribes: Laxman Gaikwad
sakal
छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : भटक्या विमुक्तांना गुलाम करण्याचे काम राज्यकर्त्यांकडून होत आहे. आमचा एकही आमदार नसताना, मराठी साहित्य परिषदेने आमचा सत्कार केल्याबद्दल आभार. आमचे वैरी ब्राह्मण असल्याचे सांगितले, तरी एकही ब्राह्मण आम्हाला दगड मारायला येत नाही. मधल्या जातींचाच आम्हाला विरोध आहे. आता मंत्री शिवेंद्रसिंहराजेंकडून अपेक्षा असून, आमच्या समाजाला संधी द्या, संविधानात सामावून घेऊन शिक्षणाची दारे आमच्यासाठी खुली करा, अशी आर्त हाक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी दिली.