
कऱ्हाड : वाकुर्डे पाणी योजनेवर सोलर फिडर उभारण्यासाठी महत्त्वाचा प्रस्ताव तयार करा, अशी सूचना आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली. त्या सोलर फिडरला मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव मंजूर करून आणू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. त्यामुळे वाकुर्डेच्या वीजबिलातून शेकडो शेतकऱ्यांची सुटका होणार आहे.