राजेंनी पुन्हा घातला कॉलरला हात; म्हणाले, एक बार जो मैने कमिटमेंट करली, तो..

छत्रपती शिवरायांच्‍या विचारांचा वारसा पुढे नेण्‍यासाठी एकत्र येण्याचे आवाहन
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal
Summary

कार्यक्रमादरम्‍यान उदयनराजेंनी भाषणाचा शेवट बरेच दिवस डायलॉग मारला नसल्‍याचे म्‍हणत पुन्‍हा एकदा कॉलरला हात घातला.

सातारा (सातारा) : सातारा शहराशी नाळ असणारे अनेक जणांनी परजिल्ह्यात, राज्‍यात आपल्‍या कर्तृत्‍वावर आपले विश्‍‍व निर्माण केले आहे. त्‍या सातारकरांचा आम्‍हाला अभिमान आहे. जन्‍मभूमी असणाऱ्या साताऱ्याला त्‍यांनी यापुढील काळात कर्मभूमी करणे आवश्‍‍यक असून, त्‍यांनी साताऱ्याच्‍या विकासासाठी या मातीत आपले व्‍यवसाय सुरू करण्‍यासाठी परतणे आवश्‍‍यक असल्‍याचे मत खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी येथील इनोव्‍हेटिव्‍ह (Innovative Satara) सातारा या कार्यक्रमा‍त केले. याचदरम्‍यान त्‍यांनी नवनिर्मिती आणि नवसंकल्‍पनेचे जनक असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्‍या (Chhatrapati Shivaji Maharaj) विचारांचा वारसा पुढे नेण्‍यासाठी एकत्र येण्‍याचे आवाहन उपस्‍थितांना केले.

कार्यक्रमादरम्‍यान सातारा विकासासाठी नागरिकांना मते मांडता यावीत, यासाठी उदयनराजे भोसले डॉटकॉम (Udayanraje Bhosale Dotcom) या नावाने वेबसाईटही कार्यान्‍वित करण्‍यात आली. कार्यक्रमाच्‍या सुरुवातीस उद्योजक नाना देशमुख, आयटी सेक्‍टरमधील पवनजीत माने, अभिजित माने, पर्यटन क्षेत्रातील अनिल कदम, शैलेंद्र करंदीकर, हॉटेल व्‍यावसायिक राजू भोसले, क्रीडा क्षेत्रातील सुजित शेडगे, वास्‍तुविशारद क्षेत्रातील नेहा देशमुख, शिवानी शिंदे, बांधकाम क्षेत्रातील ॲड. मज्‍जीद कच्‍छी, मनोरंजन क्षेत्रातील तेजपाल वाघ, शिक्षण क्षेत्रातील विशाल ढाणे, व्‍यापार क्षेत्रातील प्रशांत मोदी, सुदीप भट्टड, कृषी क्षेत्रातील लोकेश उत्तेकर यांनी सातारा शहराच्‍या सर्वांगीण विकासासाठी काय उपाययोजना राबवाव्‍यात, या विषयीची मते मांडली.

Udayanraje Bhosale
गुंड जामिनावर बाहेर आले तर देशात, राज्‍यात मोठा उद्रेक होईल : उदयनराजे
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale

त्‍यांची मते जाणून घेतल्‍यानंतर उदयनराजे म्‍हणाले,‘‘अनेक सातारकर अनेक ठिकाणी विस्‍तारले आहेत. त्‍या गावावरून सातारकरांची नव्हे, तर सातारकरांमुळे त्‍या गावांची नव्‍याने ओळख जगाला झाली आहे. सातारा येथील एमआयडीसीचा चेहरमोहरा आपल्‍याला बदलायचा आहे. मी एकटा काहीही करू शकणार नाही. त्‍यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्‍‍यक आहे. सातारा सोडून इतर भागातील एमआयडीसी जोरात सुरू आहेत. सातारा एमआयडीसीचा विकास का झाला नाही, ते त्‍यावेळचे प्रतिनिधी सांगू शकले असते. कारण त्‍यावेळी मी विद्यार्थी होतो. महाराष्‍ट्र ‍स्‍कूटर्ससह इतर मोठ्या बंद कंपन्‍या आपल्‍याला पुन्‍हा सुरू होण्‍यासाठी प्रयत्‍न करायचे आहेत. त्‍याबाबत आम्‍ही सक्रिय झालोय. या मेळाव्‍यात सहभागी झालेल्‍या प्रत्‍येकाने आपापल्‍यापरीने त्‍यासाठी सक्रिय होणे गरजेचे असल्‍याचे मतही त्‍यांनी व्‍यक्‍त केले. सातारा परिसरात विपुल संपदा असून, त्‍याचा वापर आपल्‍याला पर्यटन विकासासाठी कसा करता येईल, याचा कृतिबध्‍द कार्यक्रमही आपण तयार करत असल्‍याचेही त्‍यांनी या वेळी स्‍पष्‍ट केले.

Udayanraje Bhosale
'कारखान्याला कधीच विरोध केला नाही, म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं'

त्‍यात लोकप्रतिनिधींची व्‍यापकता

सातारा येथे क्रीडा क्षेत्रासाठी पुरेसा वाव नसल्‍याचा मुद्दा उपस्‍थित झाल्‍यानंतर उदयनराजे म्‍हणाले,‘‘सातारा येथील क्रीडा संकुलाचे व्‍यापारीकरण झाले आहे. मोठ्या प्रमाणात गाळे काढल्‍याने क्रीडा क्षेत्राची वाढ खुंटली गेली. खरेतर ते काम करण्‍यास भूमिपुत्र असलेल्‍या बी. जी. शिर्के हे पुढे आले होते. मात्र, त्‍यांना हे काम देण्‍यात आले नाही. हे काम त्‍यावेळचे पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी नवख्‍या माणसास दिले. त्‍यामागे त्‍यांची व्‍यापकता होती, असे वक्‍तव्‍य करत उदयनराजेंनी विद्यमान उपमुख्‍यमंत्री अजित पवारांवर टीका केली.

पुन्‍हा एकदा कमिटमेंट

कार्यक्रमादरम्‍यान उदयनराजेंनी भाषणाचा शेवट बरेच दिवस डायलॉग मारला नसल्‍याचे म्‍हणत पुन्‍हा एकदा कॉलरला हात घातला. कॉलर उंचावत त्‍यांनी पुन्‍हा एकदा, ‘एक बार जो मैने कमिटमेंट करली, तो अपने आप की नही सुनता,’ अशी डायलॉकफेक केली. या डायलॉगफेकीला उपस्‍थितांनी टाळ्यांच्‍या कडकडाटात दाद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com