तारळे विभागात चोरट्यांचा धुमाकूळ

चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे
Theft
Theftesakal
Updated on

तारळे - सीसीटीव्ही कॅमेरे बसल्यामुळे किरकोळ चोऱ्यामाऱ्यांवर आळा बसला असला तरी सलगच्या चोरीच्या घटनांनी त्याला छेद दिला आहे. चोरट्यांनी मंदिरेही सोडलेली नाहीत. नदीकाठावरील शेतीपंपांच्या केबल चोरीच्‍या प्रकाराने शेतकरीही हैराण आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही चोरट्यांनी केलेले धाडस पोलिसांना आव्हान देणारे आहे. पोलिसांनी त्याचा छडा लावून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.

येथील तारकेश्वर मंदिरातील समई, धनगरवाडीतील हनुमान मंदिरातील समई व घंटा चोरीस गेली. येथून दीड किलोमीटरवरील धनगरवाडी परिसरातील हनुमान मंदिरातून २० किलोचा ऐवज चोरीस गेल्याने ग्रामस्थ अवाक्‌ झाले होते. येथील मध्यवर्ती भागात बुधवार पेठ, बस स्थानक व पोलिस दूरक्षेत्र असलेल्या तारकेश्वर मंदिरातील सुमारे पाच फूट उंच व पंधरा किलो वजनाची समईची चोरी झाली. चोरट्यांनी मंदिरांना लक्ष्य केले असे वाटत असतानाच केबल चोरी झाली.

गोरेवाडी, लोरेवाडी येथील राजेंद्र लोरे, तानाजी घाडगे, शिवाजी घाडगे, तात्याबा घाडगे यांच्या सुमारे १५० फूट शेतीपंपांची वायर चोरीस गेली. तारळेतील डॉ. आरती म्हावशे, काटेवाडीतील अर्जुन गौरूले, दत्तात्रय जरग, जगन्नाथ जरग, संतू जरग, दशरथ जरग यांच्याही शेतीपंपांची केबल चोरीस गेली आहे. यात हजारापासून पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी नदीकाठावरील सर्व विद्युत पंप वाहून गेले होते. त्याची कसलीही भरपाई मिळाली नाही, त्यातच या केबल चोरीची भर पडली आहे. अनेकांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत. तपासाचे आव्हान पोलिसांच्या समोर असून ते कसा छडा लावतात, याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com