Minister Jaykumar Gore
पक्ष वाढला पाहिजे, पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे. हे करताना कोण नाराज होतंय किंवा कोणाला वाईट वाटतंय हा विषय मॅटर करत नाही. संघटन वाढवण्यासाठी आणि आपल्या विचाराच्या लोकांना बळ देण्यासाठी आजपर्यंत आपण कोणालाही अंगावर घेतलंय. घेत राहीन, अशा शब्दांत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी वाईपासून पाटणपर्यंत आणि माणपासून महाबळेश्वरपर्यंत पक्षमजबुतीचे आपले इरादे स्पष्ट केले. ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सातारा जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता येईल, असे सांगतानाच वर्षभरानंतर जिल्हा बॅंकही भाजपच्या ताब्यात येईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
- राजेश सोळसकर