
-अमोल बनकर
शाहूनगर : निसर्गसंपन्नतेसह शांततेचा आनंद देणाऱ्या गोडोली येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डन आता ज्ञान संपन्नताही देणार आहे. तब्बल चार गुंठे जागेत अद्ययावत अभ्यासिका येथे उभारण्यात आली आहे. या अभ्यासिकेत एकावेळी १५० विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.