esakal | समृध्द महाराष्ट्रात असंही काही घडतंय; रुग्णालयात उपचारासाठी 'डाल' घेऊन पायपीट I Mahabaleshwar
sakal

बोलून बातमी शोधा

Mahabaleshwar

गेल्या चाळीस वर्षांपासून रस्त्याचे काम अपूर्णच असल्याने कोंडोशीतील लोक हलाखीचे जीवन जगत आहेत.

समृध्द महाराष्ट्रात असंही काही घडतंय; रुग्णालयात उपचारासाठी 'डाल' घेऊन पायपीट

sakal_logo
By
सूर्यकांत पवार

कास (सातारा) : गेल्या चाळीस वर्षांपासून रस्त्याचे काम अपूर्णच असल्याने कोंडोशीतील (Mahabaleshwar) लोक हलाखीचे जीवन जगत आहेत. कोंडोशी गावकऱ्यांसाठी ही एक परंपरा होऊन गेलीय. 160 ते 170 लोकसंख्या असलेल्या गावात रस्त्याचे काम ही अर्धवट झाले आहे, अजूनही कोंडोशीपर्यंत कच्चा रस्ता सुद्धा गेलेला नाहीये, दरवर्षी रस्त्याचे काम मंजूर होऊन येते, परंतु ते सुद्धा अर्धवट!

कुमठे गावापासून फक्त 6 किमी अंतरावर असलेले हे कोंडोशी गाव आणि या 6 किमी कामासाठी जर 40 वर्षे लागत असतील, तर प्रशासनासाठी ही लाजिरवाणी गोष्ट म्हणावी लागेल, अशी ग्रामस्थांची म्हणणे आहे. रस्त्याच्या अडचणींबद्दल बऱ्याच वेळा गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली, परंतु अजूनही दुर्लक्षच होत आहे. ग्रामपंचायतपासून ते वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. कोंडोशी रस्त्याचे अर्धवट झालेले काम हे सुद्धा 22 ते 23 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत पावसामुळे पूर्ण रस्त्यावर दरड कोसळून, तसेच रस्ता खचून गेला आहे. सध्या लोकांना चालत जाण्यासाठी (दळणवळण) पर्यायी मार्ग तोच आहे. परंतु, तो मार्गसुद्धा अवघड झालाय.

हेही वाचा: भाजपच्या राजेंविरोधात राष्ट्रवादी मैदानात

त्यामध्ये आजच एक घटना कोंडोशीमध्ये घडली. आजारी झालेल्या गोपाबाई सखाराम जाधव (वय 75) यांना दवाखाण्यात घेऊन जाण्यासाठी डालाचा वापर करण्यात आला. त्यांना खांद्यावर घेऊन कुमठे येथे घेऊन आले. त्यानंतर त्यांना पुणे (काळेवाडी) या ठिकाणी उपचारासाठी घेऊन जाण्यात आले. रस्त्यावर दरड कोसळल्याने गावकऱ्यांना खूप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून या दूरवस्थेबद्दल गावकरी संताप व्यक्त करत आहेत.

loading image
go to top