
सध्या ऊसतोड हंगाम सुरू असल्याने कऱ्हाड ते मसूर रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. फाटकाजवळ मसूर बाजूकडे रस्त्याला तीव्र वळण व उतार आहे. याठिकाणी प्रामुख्याने ट्रॅक्टर व बैलगाड्यांची संख्या जास्त असते. रहदारीत अडथळा आल्यानंतर, फाटक बंद असताना वाहनांची रिघ लागते. अशा वेळी उसाने भरलेल्या बैलगाड्या बऱ्याचदा अडकतात. मानेवर ओझे आणि वाहनांच्या हॉर्नमुळे बैल बिथरतात.
शिरवडे (जि. सातारा) : कऱ्हाड ते मसूर रस्त्यावरील रेल्वे फाटकानजीक असलेला तीव्र चढ-उतारासह असलेले वळण वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरते आहे. मुख्य रस्त्यावरील रेल्वे फाटक नेहमीच वाहतूक कोंडीसह अपघाताला निमंत्रण देत असते. विविध कारणाने नेहमी चर्चेचा विषय बनलेल्या या फाटकाचे ठिकाण या भागातील नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरते आहे. तरीही त्याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाही.
सध्या ऊसतोड हंगाम सुरू असल्याने या रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. फाटकाजवळ मसूर बाजूकडे रस्त्याला तीव्र वळण व उतार आहे. याठिकाणी प्रामुख्याने ट्रॅक्टर व बैलगाड्यांची संख्या जास्त असते. रहदारीत अडथळा आल्यानंतर, फाटक बंद असताना वाहनांची रिघ लागते. अशा वेळी उसाने भरलेल्या बैलगाड्या बऱ्याचदा अडकतात. मानेवर ओझे आणि वाहनांच्या हॉर्नमुळे बैल बिथरतात. त्यामुळे बैल जखमी होणे तसेच बैलगाडीची मोडतोड होते.
चांगला पाऊस, पोषक वातावरणाचा 'माण'च्या शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा; कृषी विभागाचे आवाहन
तसेच ऐन चढावर, रूळावरून जाताना अवजड ट्रॉलीसह ट्रॅक्टरही अडकतात. अशात वाहनधारक व ट्रॅक्टर, गाडीवानांत वादाचे प्रसंग होत असतात. ट्रॅक्टरचालक स्थानिक असल्याने त्यांचे निभावते; पण ऊसतोड मजूर बाहेरगावचे असल्याने त्यांना नाहक त्रास दिला जातो. रेल्वे फाटकावर कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ केली जाते. यासाठी येथे कारखाना हंगामात पोलिस कर्मचारी नेमण्यात यावा, अशी वाहनधारकांची अपेक्षा आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे