साताऱ्यातून मोठी बातमी! डॉ. संतोष पोळ हत्याकांड प्रकरणी माफीची साक्षीदार ज्योती मांढरेला जामीन मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Santosh Pol Jyoti Mandhare

डॉ. संतोष पोळ या सीरियल किलरनं 6 जणांचे खून करून ते मृतदेह त्याच्या फार्म हाऊसमध्ये पुरले होते.

साताऱ्यातून मोठी बातमी! डॉ. संतोष पोळ हत्याकांड प्रकरणी माफीची साक्षीदार ज्योती मांढरेला जामीन मंजूर

सातारा : साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. न्यायालयानं वाई हत्याकांड प्रकरणी महत्वाचा निकाल दिला आहे. सातारा जिल्ह्यासह देशात गाजलेल्या तथाकथित डॉ. संतोष पोळ (Dr. Santosh Pol) यानं केलेल्या वाई हत्याकांड प्रकरणातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे (Jyoti Mandhare) हिला सातारा जिल्हा न्यायालयानं (Satara District Court) 1 वर्षासाठी जामीन मंजूर केला आहे.

6 जणांचा खून करून मृतदेह फार्म हाऊसमध्ये पुरले

वैद्यकीय उपचारासाठी ती तब्बल सहा वर्षांनंतर मोठ्या कालावधीसाठी बाहेर येणार आहे. डॉ. संतोष पोळ या सीरियल किलरनं 6 जणांचे खून करून ते मृतदेह त्याच्या फार्म हाऊसमध्ये पुरले होते. यातील एका खुनात ज्योती मांढरे हिचा सहभाग आढळला होता.

हेही वाचा: BJP : शरद पवारांच्या हस्तकाला पुन्हा अंडा सेल दाखवण्याची वेळ आलीय; भोसलेंचा भुजबळांवर प्रहार

सहा वर्षांपूर्वी हत्याकांड आलं उजेडात

सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं 2016 मध्ये म्हणजे सहा वर्षापूर्वी हे हत्याकांड उजेडात आणल्यानंर वाईसह सातारा जिल्हा हादरून गेला होता. वाई हत्याकांडाची सुनावणी सातारा जिल्हा न्यायालयात सुरू आहे. दरम्यान, ज्योती मांढरे हिच्या वतीनं न्यायालयात तिला वैद्यकीय उपचारासाठी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असता न्यायालयानं तिला अटी-शर्तीवर मंजुरी दिलीय.

हेही वाचा: Afghanistan : काबुलमधील शाळेवर मोठा दहशतवादी हल्ला; 24 विद्यार्थी ठार