esakal | कोरोनाविरुध्दच्या लढाईत प्रशासनाला सहकार्य करा; पालकमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Patil

कोरोनाविरुध्दच्या लढाईत प्रशासनाला सहकार्य करा; पालकमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : राज्यासह जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये 78 ऑक्‍सिजन बेडचे जिल्हा कोविड रुग्णालय सुरू केले आहे. कोरोना रुग्णांना यामुळे निश्‍चित दिलासा मिळणार आहे. शासनाने कडक निर्बंध घातलेले आहेत, तरीही काही जण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्याचा परिणाम रुग्णवाढीवर होत आहे. नागरिकांनी शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करावे व कोरोनाच्या लढाईत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने सुरू केलेल्या जिल्हा कोविड रुग्णालयाचे उद्‌घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण उपस्थित होते.

नितीन गडकरींकडून 460 कोटींचा निधी, ही अभिमानाची बाब; खासदार पाटलांकडून कामाचं कौतुक

कोरोना रुग्णांना अधिकच्या सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, "एक मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत शासनाने कडक निर्बंध घातलेले आहेत, तरीही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्याचा परिणाम रुग्णवाढीवर होत आहे. नागरिकांनी शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करावे. ज्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित आहेत. अशा कुटुंबातील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये, तसेच नागरिकांनी मास्कचा वापर, वेळोवळी हाताची स्वच्छता, सुरक्षित अंतर व विनाकरण घराबाहेर पडू नये. या कोरोनाच्या लढाईत सर्वांनी सहकार्य करावे.''

Edited By : Balkrishna Madhale

loading image
go to top