esakal | नितीन गडकरींकडून 460 कोटींचा निधी, ही अभिमानाची बाब; खासदार पाटलांकडून कामाचं कौतुक

बोलून बातमी शोधा

Gadakari-Patil
नितीन गडकरींकडून 460 कोटींचा निधी, ही अभिमानाची बाब; खासदार पाटलांकडून कामाचं कौतुक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : कोल्हापूर नाक्‍यावर अपघातांमुळे निरपराध लोकांचा मृत्यू झाल्याने कोल्हापूर नाका येथे उड्डाण पूल असावा, यासाठी कोल्हापूर नाका कृती समितीने पाठपुरावा केला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार होतो. मात्र, कोरोनाने ती भेट लांबली. तोपर्यंत मंत्री गडकरी यांनी 460 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. ही अभिमानाची बाब आहे, अशी माहिती खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली.

पुणे-बंगळूर महामार्गावर कोल्हापूर नाक्‍यावर उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कोल्हापूर नाका उड्डाण पूल कृती समितीतर्फे खासदार पाटील यांचा सत्कार झाला. त्यावेळी त्यांनी माहिती दिली. संसदेत कोल्हापूर नाक्‍यावरील मुद्दा मांडल्यानंतर मंत्री नितीन गडकरी यांनी निधी दिल्यानंतरही जिल्ह्यातील महामार्गावरील आणखी अपघातप्रवण ठिकाण शोधून सांगावे, तेथे सुधारणा करण्यास प्राधान्य देऊ, असे आश्वासन मंत्री गडकरी यांनी दिल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.

कोरोनाला आळा घालण्यासाठी पळशीत 100 टक्के लसीकरण; पालकमंत्र्यांकडून कौतुक

कऱ्हाडकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक केल्याबद्दल शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, जयंत बेडेकर, पोपटराव साळुंखे, शिवाजी पवार, मोहम्मद आवटे, मुंढेचे उपसरपंच सागर पाटील, अशोक माळी, बाजीराव चव्हाण, बापू करपे उपस्थित होते.

Edited By : Balkrishna Madhale