Balasaheb Patil addressing the gathering, urging members to stay proud and vigilant in his latest political speech.Sakal
सातारा
Balasaheb Patil : आपलं नाणं खणखणीत; गाफील राहू नका : बाळासाहेब पाटील; मेळाव्यास सभासदांचा प्रतिसाद
Karad News : सर्वसामान्यांसाठी निगडित असलेल्या या कारखान्यावर अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून आहे. मात्र, विरोधक जाणीवपूर्वक संस्थेची बदनामी करत आहेत; परंतु आपले नाणं खणखणीत आहे.
मसूर : सह्याद्री कारखान्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक परिवर्तन घडत आहे. त्यातून शेतकऱ्याला फायदा होतो. सर्वसामान्यांसाठी निगडित असलेल्या या कारखान्यावर अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून आहे. मात्र, विरोधक जाणीवपूर्वक संस्थेची बदनामी करत आहेत; परंतु आपले नाणं खणखणीत आहे. निवडणुकीसाठी आपल्याला पोषक व उत्साहवर्धक वातावरण आहे. मात्र, गाफील राहू नका, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले.

