बाळासाहेब म्हणतात, वयाच्या सत्तरीतही मी कोरोनाला गाडून आलो! 

सुनील शेडगे
Wednesday, 23 September 2020

घरातले सर्वजण सदैव पाठीशी होतेच. कोरोना बरा होऊ शकतो. त्याला आत्मविश्वासाने, खंबीरपणे सामोरे जाणे आवश्‍यक आहे. मनातील अनावश्‍यक भीती काढून टाकणे योग्य ठरते. 

सातारा  : मी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते मला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. वयाची सत्तरी ओलांडताना आजवर विविध आजारांना मी सामोरे गेलो आहे. मात्र, आयुष्यात मी कधीही खचून गेलो नाही. कधीही हार मानली नाही.

मधुमेह, रक्तदाब, अर्धांगवायू, अँजिओप्लास्टी यांसारख्या व्याधी विसरून मी आजही उत्तम शेती करतो. विविध उपक्रमांत सहभागी होतो. अशातच अलीकडे माझ्या शरीरावर कोरोनाने आक्रमण केले. मात्र, प्रबळ इच्छाशक्तीमुळे कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकण्यात यशस्वी ठरलो असे नागठाणेतील बाळासाहेब साळूंखे यांनी नमूद केले.

कोरोना हरतो रे भाऊ; गाैरी राहूल चव्हाण
 
ते म्हणाले, सुरवातीला बारीक ताप, अंगदुखी, अशक्तपणा, खोकला ही प्राथमिक लक्षणे जाणवत होती. मग आधी नागठाणे अन्‌ नंतर साताऱ्यातील खासगी दवाखान्यात औषधोपचार घेतले. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये नऊ दिवस व्हेंटिलेटरवर होतो. तिथे दैनंदिन उपचारासह मनोबल उंचाविण्याचे कार्यक्रम राबविण्यात आले. श्वसनाच्या, पोटावर झोपण्याच्या व्यायामाचे फायदे झाले. योगासने अन्‌ प्राणायाम महत्त्वाचे ठरले.

सातारा-जावळी असा दुजाभाव मी कधीच केला नाही : शिवेंद्रसिंहराजे

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले, राजू भोसले, डॉ. प्रवीणकुमार जरग, डॉ. जयदीप चव्हाण, डॉ. आर. जी. कांबळे, नागठाण्याचे सरपंच विष्णू पाटील तसेच हितचिंतकांचे पाठबळ कामी आले. घरातले सर्वजण सदैव पाठीशी होतेच. कोरोना बरा होऊ शकतो. त्याला आत्मविश्वासाने, खंबीरपणे सामोरे जाणे आवश्‍यक आहे. मनातील अनावश्‍यक भीती काढून टाकणे योग्य ठरते. 

...अशी घ्यावी काळजी 

सध्याच्या काळात घराबाहेर पडू नये.
 
मास्कचा वापर सतत आवश्‍यक.
 
सॅनिटायझरचा वापरही आवश्‍यक.
 
बाहेरून आल्यानंतर हात, पाय.
 
स्वच्छ धुणे महत्त्वाचे ठरते.
 
घरात असतानाही परस्परांत पुरेसे अंतर ठेवून असणे आवश्‍यक.
 
वयोवृद्ध लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी.
 
योगासने, प्राणायाम याला पर्याय नाही.
 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Salunkhe Expressed Views After Recovery From Covid 19 Satara News