esakal | 'दुधात भेसळ करणाऱ्या पांढऱ्या बोक्यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन'
sakal

बोलून बातमी शोधा

Baliraja Farmers Association

सर्वसामान्य नागरिकांचे सकस आहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ करून कृत्रिम दूध तयार केले जात आहे.

'दुधात भेसळ करणाऱ्या पांढऱ्या बोक्यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन'

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : जिल्ह्यात दुधात भेसळ (Milk Adulteration) करणाऱ्या दूध संघातील (Milk Union) पांढऱ्या बोक्यांवर अन्न भेसळ विभागाने (Food Adulteration Department) कारवाई करावी, अन्यथा सहायक आयुक्तांच्या कार्यालयासमोर बळिराजा शेतकरी संघटना (Baliraja Farmers Association) तीव्र आंदोलन करेल, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला (Sajid Mulla) यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे. जिल्हाध्यक्ष मुल्ला, युवा जिल्हाध्यक्ष सुशांत गोळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी सातारा तालुकाध्यक्ष किरण गोडसे, सातारा युवा तालुकाध्यक्ष सागर शेळके व संघटनेचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व सहायक आयुक्त यांना निवेदन दिले. (Baliraja Farmers Association Demand Government To Take Action Against Those Who Adulteration Milk Satara Marathi News)

निवेदनातील माहिती अशी : सर्वसामान्य नागरिकांचे सकस आहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ करून कृत्रिम दूध (Artificial Milk) तयार केले जात आहे. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या आहारात अविभाज्य घटक असलेल्या दुधात युरिया, पामतेल, मेलामाईनसारखे विषारी रसायन मिसळून स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा गोरखधंदा दूध संकलन करणाऱ्यांनी मांडला आहे. राज्य सरकारने (Maharashtra Government) कायद्यामध्ये बदल करून प्रशासन अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात दूध भेसळ अन्न भेसळ झाली असेल, तर त्याची जबाबदारी अन्न भेसळ अधिकाऱ्यावर निश्चित केली पाहिजे.

हेही वाचा: ..अखेर घनकचऱ्याच्या कार्यादेश ठरावावर नगराध्यक्षांची स्वाक्षरी!

राज्य सरकारने असा कायदा करून घ्यावा. त्यामुळे भेसळ करणाऱ्या वर अंकुश ठेवता येईल. दुधात मोठ्या प्रमाणावर विषारी पदार्थ मिसळून दररोज लाखो रुपये मिळविणारी आपल्या सातारा जिल्ह्यात अशा पांढऱ्या बोक्यांची टोळीच माजली असल्याचे धक्कादायक चित्र आहे. जिल्ह्यात दररोज लाखो लिटर दुधाचे संकलन होत असताना गेल्या काही वर्षांत अन्न भेसळ विभागाची अपवाद सोडला, तर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे सर्व काही अलबेला आहे की गोलमाल आहे हे नक्की सांगता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी खेळ चालला आहे. भेसळ करणाऱ्या टोळीच्या प्रशासनाने मुसक्या आवळाव्या. अन्यथा बळिराजा शेतकरी संघटना सहायक आयुक्त अन्न प्रशासन सातारा यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असाही इशारा दिला आहे.

Baliraja Farmers Association Demand Government To Take Action Against Those Who Adulteration Milk Satara Marathi News

loading image