esakal | ..अखेर घनकचऱ्याच्या कार्यादेश ठरावावर नगराध्यक्षांची स्वाक्षरी!
sakal

बोलून बातमी शोधा

Mayor Rohini Shinde

पालिकेच्या नवीन घनकचऱ्याच्या निविदा कार्यादेशाच्या ठरावावर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी अखेर स्वाक्षरी केली. त्यामुळे कचरा संकलनाच्या घंटागाड्या सुरू झाल्या.

..अखेर घनकचऱ्याच्या कार्यादेश ठरावावर नगराध्यक्षांची स्वाक्षरी!

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (सातारा) : पालिकेच्या (Karad Municipality) नवीन घनकचऱ्याच्या निविदा कार्यादेशाच्या ठरावावर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे (Mayor Rohini Shinde) यांनी अखेर स्वाक्षरी केली. त्यामुळे कचरा संकलनाच्या घंटागाड्या सुरू झाल्या. मात्र, दोन दिवसांपासून घरोघरी पडून राहिलेला कचरा गोळा करताना घंटागाड्यांची दमछाक उडाली. सलग दुसऱ्या दिवशी घंटागाड्यांचे नियोजन फिस्कटले होते. सायंकाळपर्यंत त्यात सुरळीतपणा आला नव्हता. त्यामुळे शहरातील बहुतांशी भागात घंटागाड्या पोचल्या नव्हत्या. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकारही झाले. त्यावरही पालिकेने पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. (Mayor Rohini Shinde Signed The Solid Waste Project Satara Political News)

काही कारणाने नगराध्यक्षांची ठरावावर स्वाक्षरी नव्हती, ती त्यांनी आज केली, अशी माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके (Chief Officer Ramakant Dake) यांनी दिली. ते म्हणाले, त्यामुळे कचरा विघटन, संकलन व रस्ते, गटर सफाईचे निविदेप्रमाणे आजपासून काम सुरू जाले आहे. मात्र, दोन दिवसांचा कचरा गोळा करताना घंटागाड्यांची क्षमता अपुरी पडते आहे. अर्ध्या वाटेतच घंटागाडी फुल्ल होत आहे. त्यामुळे त्याचे नियोजन अद्यापही सुरळीत झालेले नाही. ते उद्यापर्यंत सुरळीत होईल. दोन दिवस नागरिकांनीही कचरा बाहेर न टाकता सहकार्य निश्चित केले आहे. घंटागाड्यांच्या निविदेवर नगराध्यक्षा शिंदे यांनी आज अखेर स्वाक्षरी केल्याने घनकचरा व्यवस्थापनाचे काम सुरू झाले. मात्र, अद्यापही ते सुरळीत झाले नव्हते. शहरातील घरोघरचा तब्बल आठ ते दहा टन कचरा पालिकेच्या 18 घंटागाड्याव्दारे संकलित केला जातो. त्यासह तो कचरा विघटन, प्रक्रियाही केली जाते. त्यासाठीची वार्षिक निविदा दिली जाते. त्या पहिल्या निविदेची मुदत 30 जून रोजी संपली होती. नव्या ठेकेदाराची प्रक्रिया पूर्ण झाली होती.

हेही वाचा: 'नाबार्ड'कडून जिल्हा बॅंकेचा बेस्ट परफॉर्मर पुरस्काराने सन्मान

जुन्या ठेकेदाराची वाढीव मुदत 10 जुलै रोजी संपली होती. त्याचीही मुदत संपली होती. नव्या ठेकेदाराला कार्यादेश नव्हता. शहरात कचऱ्यावरून राजकारण पेटले आहे. आजही ते राजकारण सुरूच होते. नगराध्यक्षांसहीत सत्ताधारी, विरोधकात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू होते. नगराध्यक्षा शिंदे यांनी कार्यादेशाच्या ठरावावर आज अखेर स्वाक्षरी केल्याने त्यामुळे त्या वादावर पडदा पडला असला, तरी अद्यापही कचरा संकलानाच्या कामात विस्कळीतपणाच आहे. घराघरात पडलेला कचरा काहींनी सार्वजनिक ठिकाणीही टाकला होता. तर घराघरातील कचरा गोळा करताना घंटागाड्यांची क्षमात कमी पडल्याचे दिसत होते. आजपर्यंत हा विस्कळीतपणा सुरळीत करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.

Mayor Rohini Shinde Signed The Solid Waste Project Satara Political News

loading image