
सातारा: शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे व पर्यावरणाच्या समतोलासाठी शेताचे बांध, माळरान, पडीक जमिनीवर शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करण्यासाठी ग्रामपंचायत विभाग (रोजगार हमी योजना), कृषी व सामाजिक वनीकरण विभाग गावोगावी जनजागृतीबरोबर शेतकऱ्यांशी संवाद साधत बांबू लागवडीचे महत्त्व सांगत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे चार हजार २३९ हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी जुलैअखेर जिल्ह्यातील दोन हजार १०५ शेतकऱ्यांनी एक हजार १४८ हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड सुरू केली आहे.