जिल्ह्यात तब्बल 600 व्यावसायिकांची उपासमार, बॅंड वादक रस्त्यावर

प्रशांत घाडगे
Thursday, 29 October 2020

राज्यभरात बहुतांशी सर्व व्यवसाय सुरू झाले असताना दिवसभराच्या कामावर पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे व्यवसाय बंद आहेत. आता सर्व व्यवसाय सुरळीत झाल्याने बॅंड व बॅंजो वादनाला परवानगी मिळावी, अशी मागणी बॅंड वादक असोसिएशनने निवेदनाद्वारे केली आहे.

सातारा : कोरोनाच्या संसगामुळे मागील सात महिन्यांपासून बंद असलेल्या बॅंड व बॅंजो व्यवसायाला परवानगी मिळावी, या मागणीसाठी जिल्हा बॅंड वादक असोसिएशनच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी बाबासाहेब माने, अशोक जाधव, बबन जाधव, किरण जाधव आदी उपस्थित होते. 

जिल्ह्यात बॅंड व बॅंजो व्यावसायिकांची संख्या सुमारे 600 आहे. गेल्या सात महिन्यांपासून व्यवसाय ठप्प असल्याने बॅंड चालक व कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. या पथकात 20 ते 22 वादक काम करत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न समोर आला आहे. 

चांदोलीत आढळला सोनेरी पाठीचा बेडूक; सिंधुदुर्गात नामकरण सोहळा

राज्यभरात बहुतांशी सर्व व्यवसाय सुरू झाले असताना दिवसभराच्या कामावर पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे व्यवसाय बंद आहेत. आता सर्व व्यवसाय सुरळीत झाल्याने बॅंड व बॅंजो वादनाला परवानगी मिळावी, अशी मागणी असोसिएशनने निवेदनाद्वारे केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Band Artist Agitation In Front Of Satara District Collector Office Satara News