अटीतटीच्या लढतीत सहकारमंत्र्यांसह गृहराज्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

NCP
NCPesakal
Summary

दहा जागांवर दोन विद्यमान मंत्री, दोन आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election 2021) अखेरच्या क्षणापर्यंत खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांना राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांनी झुलवत ठेवले. अखरे अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) यांनी शिवेंद्रसिंहराजेंची मनधरणी केली अन्‌ उदयनराजेंचा मार्ग मोकळा झाला. सातारा सोसायटी मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजेही (MLA Shivendrasinharaje Bhosale) बिनविरोध निवडून आले. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी संचालकांच्या २१ पैकी ११ जागा बिनविरोध करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आले, तर दहा जागांवर दोन विद्यमान मंत्री, दोन आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येत्या २१ तारखेला मतदान होणार आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक यावेळेस पहिल्या दिवसापासून चुरशीची आणि अटीतटीची होणार, हे निश्चित झाले होते. पण, राष्ट्रवादीने सर्वसमावेशक पॅनेलचा मुद्दा काढला होता. त्यामुळे पक्षविरहित पॅनेल करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यासाठी सर्वाधिक मते सातारा तालुक्यात असल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजेंना आपल्यासोबत घेऊन राष्ट्रवादीने निम्मी निवडणूक सोपी केली होती. प्रश्न होता तो उदयनराजे व आमदार जयकुमार गोरे यांचा. त्यांना सामावून घेण्याबाबत पहिल्यापासूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांत नकारघंटा होती. शिवेंद्रसिंहराजेंचा तर पहिल्यापासूनच उदयनराजेंना विरोध होता. त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून सर्व अडचणी दूर करण्याची भूमिका रामराजे व सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतली होती. त्यासाठी सातत्याने चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महाबळेश्वर सोसायटीतून राजेंद्र राजपुरे, खरेदी-विक्री संघातून मकरंद पाटील आणि कृषी उत्पादन प्रक्रिया संस्था मतदारसंघातून शिवरुपराजे खर्डेकर बिनविरोध झाले.

NCP
नाकाबंदी भेदत राजेंची जिल्हा बॅंकेत दमदार एन्ट्री
Balasaheb Patil
Balasaheb Patil

उर्वरित जागा बिनविरोध करण्यासाठीची तयारी बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) व रामराजे यांच्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोपवली होती. त्यानुसार या दोन्ही नेत्यांनी आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील व शिवेंद्रसिंहराजेंच्या मदतीने रणनीती आखली होती. पुणे, साताऱ्यात चर्चेच्या फेऱ्या झाल्या. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जास्तीत जास्त जागा बिनविरोध करण्याची भूमिका या नेत्यांनी घेतली होती. त्यानुसार आज सकाळपासूनच जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील खल सुरू होता. या बैठकीस व्हिडिओ कॉलव्दारे रामराजे सहभागी झाले होते. यावेळी मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, नितीन पाटील, विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, तसेच राष्ट्रवादीची मंडळी व इच्छुक संचालक-संचालिका उपस्थित होत्या. बैठकीत एका-एका मतदारसंघावर चर्चा करत राष्ट्रवादीचा उमेदवार वगळता उर्वरितांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात येत होते. त्यानुसार एक-एक करत सर्वांनी अर्ज मागे घेतले. ११ संचालकांच्या जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये सोसायटीच्या पाच, खरेदी-विक्री संघ एक, अनुसूचित जाती-जमाती एक, विमुक्त जाती, भटक्या जमाती एक, कृषी उत्पादन प्रक्रिया संस्था एक, गृहनिर्माण आणि दूध उत्पादक संस्था एक, औद्योगिक, विणकर, मजूर संस्था मतदारसंघाच्या एका जागेचा समावेश आहे.

NCP
बॅंक निवडणुकीसाठी NCP चे 'सहकार पॅनेल' रिंगणात

सोसायटी मतदारसंघातील कऱ्हाड, पाटण, कोरेगाव, जावळी, खटाव व माण येथे प्रत्येकी दोन अर्ज राहिल्याने तेथे निवडणूक लागली आहे. त्यामध्ये कऱ्हाडमध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विरुध्द ॲड. उदयसिंह पाटील, पाटणला सत्यजितसिंह पाटणकर विरुध्द शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), जावळीतून शशिकांत शिंदे विरुद्ध ज्ञानदेव रांजणे, कोरेगावातून शिवाजीराव महाडिक विरुध्द सुनील खत्री, खटावमधून प्रभाकर घार्गे विरुध्द नंदकुमार मोरे, माणमधून मनोजकुमार पोळ विरुध्द शेखर गोरे यांचा समावेश आहे. महिला राखीवमधून चार महिलांचे अर्ज असून साताऱ्यातील कांचन साळुंखे व कऱ्हाडच्या ऋतुजा राजेश पाटील विरुध्द चंद्रभागा शंकर काटकर (माण) व शारदादेवी सूर्याजीराव कदम (फलटण) यांच्यात लढत होत आहे. नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातून रामराव आनंदराव लेंभे विरुध्द सुनील ज्ञानदेव जाधव यांच्यात लढत होत आहे.

NCP
निवडून येताच उदयनराजेंनी गाठला सुरुची बंगला; भावाचे मानले 'आभार'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com