उदयनराजे.. नाम तो सुना ही होगा! नाकाबंदी भेदत राजेंची जिल्हा बॅंकेत दमदार एन्ट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale

उदयनराजे भोसले... राज्‍याच्‍या राजकारणात नेहमी कोणत्‍या ना कोणत्‍या कारणाने केंद्रबिंदू असणारे नाव.

नाकाबंदी भेदत राजेंची जिल्हा बॅंकेत दमदार एन्ट्री

सातारा : नको... नको... कोणत्‍याही परिस्‍थितीत ते बँकेत (Satara Bank Election 2021) नकोत.... असा विरोध करत होणारी नाकाबंदी फोडण्‍यासाठी खासदार उदयनराजेंनी वाटाघाटी, भेटीगाठी, नजराणे आणि दबावतंत्राचा पुरेपुर वापर या निवडणुकीवेळी केला. अष्‍टप्रहर-अष्‍टावधानी तंत्र-हातखंड्यांचा वापर करत उदयनराजेंनी (MP Udayanraje Bhosale) स्‍वत: भोवतीची नकारात्‍मक नाकाबंदी फोडत जिल्‍हा बँकेचा दिंडी दरवाजा युक्‍तीने फोडला. कितीही नाकाबंदी होवू द्यात, गनिमी काव्‍यात आपणही कोठे कमी नसल्‍याचे उदयनराजेंनी पुन्‍हा एकदा या निवडणुकीच्‍या निमित्ताने दाखवून दिले.

उदयनराजे भोसले... राज्‍याच्‍या राजकारणात नेहमी कोणत्‍या ना कोणत्‍या कारणाने केंद्रबिंदू असणारे नाव. हे नाव सातारा जिल्‍हा बँक निवडणुकीच्‍या निमित्ताने पुन्‍हा एकदा केंद्रबिंदू बनून जिल्‍हा, राज्‍यात गाजू लागले होते. वैयक्तिक नसली तरी सामुदायिक कारणामुळे जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीत यंदा उदयनराजेंना स्‍थान न देण्‍याचा मतप्रवाह जिल्ह्यात रुजू लागला होता. हा मतप्रवाह आमदार शिवेंद्रसिंहराजे (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांच्‍या भोवतीने वहात असल्‍याने त्‍याला आणखी महत्त्‍व आले होते. नावास होणारा विरोध लक्षात घेत उदयनराजेंनी नंतरच्‍या काळात जरंडेश्‍‍वर कर्ज प्रकरण, ईडी चौकशी, शेतकरी विमा, रयत शिक्षण संस्‍था आदी मुद्दे काढत खासदार शरद पवारांसह उपमुख्‍यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्‍यावर टीका करण्‍यास सुरुवात केली.

हेही वाचा: SDCCB : सातारा बँक निवडणुकीत दोन्ही राजे बिनविरोध

टीका करत असतानाच निवडणुकीतील संभाव्‍य विरोधकांची मोट बांधण्‍यासाठी पुढाकार घेत त्‍यासाठीच्‍या हालचाली त्‍यांनी सुरु केल्‍या. हालचाली करत असतानाच त्‍यांनी ‘मी तर आहेच- तुमच बघा’, अशी वक्‍तव्‍ये करत नावास विरोध करणाऱ्यांना इशारा देण्‍यास सुरुवात केली. टीका, दबाव, इशारा या तंत्रांचा वापर करतानाच त्‍यांनी भेटीगाठी आणि चर्चां घडवून आणत जिल्‍हा बँकेची निवडणूक बहुकेंद्रीत वरुन एककेंद्रीत करत स्‍वत:भोवती घुमविण्‍यास सुरुवात केली. दिवसेंदिवस नकारात्‍मकेची नाकाबंदी घट्ट होत असताना ती फोडण्‍यासाठीचे अष्‍टप्रहर-अष्‍टावधानी हातखंडे उदयनराजेंनी आखण्‍यास सुरुवात केली. याच हातखंड्यांमुळे अर्ज माघारीच्‍या दिवशी त्‍यांना आपल्‍या भोवती आवळलेली नाकाबंदी भेदून जिल्‍हा बँकेच्‍या दिंडी दरवाजा फोडण्‍यात यश आल्‍याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: बॅंक निवडणुकीसाठी NCP चे 'सहकार पॅनेल' रिंगणात

loading image
go to top