आमदार शिंदेंचा 'करेक्ट' कार्यक्रम करून शिवेंद्रराजेंनी धरला गाण्यावर ठेका I Satara DCC Bank | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Shivendrasinharaje Bhosale

जावलीतील जिल्हा बँकेच्या या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं.

आमदार शिंदेंचा 'करेक्ट' कार्यक्रम करून शिवेंद्रराजेंनी धरला गाण्यावर ठेका

कुडाळ (सातारा) : आमदार शशिकांत शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रांजणे यांच्या विजयी सभेत चक्क गाण्यावर ठेका धरत रांजणेंच्या हातात हात घालून डान्स केला.

जिल्ह्यात प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने जावलीतील जिल्हा बँकेच्या या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. यामध्ये आमदार शिंदे यांना पराभूत करून जिल्ह्यात इतिहास केल्याने रांजणे यांच्यासह विजयाचे शिल्पकार वसंतराव मानकुमरे यांनी निकाल लागल्यापासून मोठा जल्लोष सुरू केला आहे.

हेही वाचा: शरद पवारांच्या निष्ठावंत आमदाराचा एका मताने पराभव; पाहा व्हिडिओ

निकालानंतर जावलीतील मानकुमरे पॉईंट येथे विजयी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी रांजणेंच्या हातात हात घालून चक्क गाण्यावर ठेका धरला व विजयाचा आनंद साजरा केला.

हेही वाचा: भाजपच्या साथीनं NCP सहकारमंत्र्यांकडून 'काँग्रेस'चा करेक्ट कार्यक्रम

loading image
go to top