esakal | राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो! BJP-NCP च्या बड्या नेत्यांच्या भेटीने पुन्हा एकदा सिध्द I Satara
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale
खासदार उदयनराजे, रामराजेंच्या भेटीने निवडणुकीत रंगत

राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो!

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक (Satara Bank Election) बिनविरोध होणार की, भाजप विरुध्द महाविकास आघाडी असा संघर्ष होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. त्यातही भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) विरुध्द शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosale), शशीकांत शिंदे असा कलगीतुरा रंगत असून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) आणि शिवेंद्रसिंहराजे हे एकत्रितपणे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात व्यूहरचना आखत असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, आज खुद्द खासदार उदयनराजे यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतल्याने बॅंकेच्या निवडणुकीला एक वेगळीच रंगत आल्याचे चित्र आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) अद्याप राजकीय पातळीवरून कोणतीच हालचाल झालेली नाही. मात्र, आज खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते सभापती रामराजे यांची शासकीय विश्रामगृहात झालेली भेट चर्चेचा विषय ठरलीय. जिल्हा बॅंकच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनेल असेल, की खासदार उदयनराजे आणि राष्ट्रवादी विरोधकांना डावलून स्वतंत्र पॅनेल उभारतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आज (शुक्रवार) उदयनराजे हद्दवाढ क्षेत्रातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण करुन शासकीय विश्रामगृहात गेले. तिथे त्यांनी सभापती रामराजे यांची भेट घेतली. उदयनराजे आणि रामराजे यांच्या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याची माहिती समजू शकली नसली, तरीही ही भेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची आहे. खासदार उदयनराजे आणि रामराजे यांच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

हेही वाचा: 24 घोटाळे उघड, त्यात ठाकरे सरकारमधील 18 नेत्यांची नावं : सोमय्या

नगरपरिषद ही नागरिकांची संस्था आहे. या मातृसंस्थेच्या माध्यमातून जनतेच्या मुलभूत गरजांची पूर्तता करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या काळात सर्वच खर्चावर बंधने-मर्यादा येत असल्या तरी प्रामुख्याने हद्दवाढ झालेल्या भागाचा मुलभूत विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. त्यासाठी लागणारा निधी राज्य आणि केंद्राकडून उपलब्ध करुन घेणे, नगरपरिषदेच्या स्वनिधीतून विकास साधणे, असे विविध प्रयत्न सुरु आहेत. हद्दवाढ झालेल्या ठिकाणी आम्ही विकासाकरिता कुठेही कमी पडणार नाही, असे मत सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. सातारा नगरपरिषदेच्या शाहूपुरी भागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा: 25 सैनिकांसह सुरु झालेली Indian Air Force आता जगात चौथ्या क्रमांकावर आहे!

जिल्हा बँकेत सर्वाधिक मतदान सातारा, कराड आणि फलटण तालुक्यात आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत रामराजे नाईक-निंबाळकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि बाळासाहेब पाटील यांची भूमिका महत्वाची आहे. कराड तालुक्यातील निर्णायक मतदान असूनही बाळासाहेब पाटील यांना जिल्हा बॅंकेत प्रवेश मिळालेला नव्हता. सन २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काॅंग्रेसचे जेष्ठ नेते दिवंगत विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पॅनलमधून उदयनराजेंनी गृहनिर्माण, दूध उत्पादक संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवली. राष्ट्रवादीच्या सत्ताधारी पॅनलचे 'आ. बाळासाहेब पाटील विरुध्द उदयनराजे' अशी निवडणूक झाली. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद असूनही अन् बाळासाहेब पाटील यांच्यासारखा मातब्बर विरोधात असतानाही उदयनराजेंनी एकतर्फी विजय मिळविला होता.

loading image
go to top