esakal | 24 घोटाळे उघड, त्यात ठाकरे सरकारमधील 18 नेत्यांची नावं : किरीट सोमय्या I Thackeray Government
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya

महाविकास आघाडी सरकारने गेल्या दीड वर्षात घोटाळ्यांची परंपरा सुरू केली आहे.

24 घोटाळे उघड, त्यात ठाकरे सरकारमधील 18 नेत्यांची नावं : सोमय्या

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (सातारा) : महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) गेल्या दीड वर्षात घोटाळ्यांची परंपरा सुरू केली आहे. यामध्ये एका पाठोपाठ नेते, मंत्री घोटाळेबाज ठरले आहेत. यातील २४ घोटाळे आपण उघड केले असून, त्यात महाविकास आघाडीतील १८ नेत्यांची नावे आल्याचे प्रतिपादन भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी केले.

ईडीसंदर्भात नेमका तपास कोणाचा व्हावा, असे तुम्हास वाटते, असा थेट सवाल विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) यांना सोमय्या यांनी केला आहे. घोटाळे बाहेर काढणारे नेते अशी माझी प्रतिमा राज्यात होणे ही बाब दुर्दैवी आहे. केवळ आमचेच घोटाळे काढतो यावर बोलण्यापेक्षा घोटाळ्यांबाबत आपण सादर केलेल्या कागदपत्रांना आव्हान का करीत नाही, असा सवाल करून सोमय्या म्हणाले, ‘‘जर जनताच आमच्याकडे येऊन सांगत असेल तर जनतेच्या समस्यांना वाचा फोडणे हे आमचे काम आहे. मी अथवा भाजपच्या कोणीही घोटाळे केले असतील तर तुम्ही कारवाई का करीत नाही.’’

हेही वाचा: अजित पवारांच्या अडचणीत वाढ?निकटवर्तीयांकडे income tax छापेमारी

आपण ईडीच्या चौकशीला घाबरत नाही, असे विधान रामराजे निंबाळकर यांनी केले होते. याबाबत त्यांना छेडले असता रामराजे यांचे नाव न घेता ते म्हणाले, ‘‘मी येणार म्हणून त्यांनी असे विधान केले असेल तर मला विचार करावा लागेल. ईडीसंदर्भात तपास व्हावा, तो कोणाचा व्हायला हवा. तुमच्या मनात असे काही आहे का? माझा प्रश्न आणि शब्द प्रत्येकात अर्थ आहे. मी त्यांनाच सांगतो तुम्हीच लोकांना सांगावे ईडीसंबंधी तपास व्हावा, असे तुमच्या मनात काय आहे किंवा होते का?’’

हेही वाचा: काँग्रेसमध्ये राहण्यात काहीच अर्थ नाही; केरळात बड्या नेत्याचा राजीनामा

उद्धव ठाकरेंचे दोन शहाणे

उद्धव ठाकरेंकडे दोन शहाणे लोक आहेत. पहिल्या संजय राऊतांनी ५५ लाखांचा चोरीचा माल परत केला ना? बडबड्या राऊतांनी ईडी कार्यालयाच्या मागच्या दाराने जात रात्री बँकेचे पैसे परत केले. दुसरा शहाणा मिलिंद नार्वेकरच्या लक्षात आले, की सोमय्यांनी त्यांच्या अनधिकृत बंगला पाहिला, फोटो काढले. त्याची तक्रार आली. केंद्र सरकारच्या आलेल्या टीमने सांगितलंय की तो अनधिकृत आहे. तेव्हा त्याने ते बांधकाम स्वतःहून तोडले. तोच शहाणपणा अजित पवारांनी उद्धव ठाकरेंकडून घ्यावा व जरंडेश्वर कारखाना कोणाचा आहे हे जाहीर करावे म्हणजे माझे काम संपले, असे सोमय्या म्हणाले.

हेही वाचा: भाजपला 'जोर का झटका'; मुंडण करत आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी

loading image
go to top