Sharad Pawar
Sharad Pawaresakal

आगामी निवडणुकांची 'रणनीती' ठरणार! शरद पवार सोडविणार 'बॅंके'चा तिढा

Summary

जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पडझड झाली.

सातारा : जिल्हा बॅंकेसह (Satara Bank Election) आगामी पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना चार्ज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) हे येत्या रविवारी (ता. 31) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादी अंतर्गत निर्माण झालेला वाद मिटवून सर्वसमावेशक पॅनेल अंतिम करणार आहेत. आगामी निवडणुकांची रणनीतीही ठरविणार आहेत. त्यामुळे श्री. पवार यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पडझड झाली. त्यानंतर कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने तब्बल दीड वर्षे लॉकडाउनमध्ये गेले. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्याची गरज आहे. आगामी काळात होणाऱ्या पालिका, नगरपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदेसह सहकारी संस्थांच्या निवडणुकाही पक्षासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी व जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील पॅनेलचा तिढा सोडविण्यासाठी शरद पवार येत्या रविवारी साताऱ्यात येत आहेत. सकाळी नऊ वाजता त्यांचे साताऱ्यात विश्रामगृहात आगमन होईल. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी व आमदार, खासदारांसोबत बैठक घेऊन चर्चा करतील. या बैठकीनंतर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.

Sharad Pawar
'वर्दीवर टोपी घालायला लाज वाटते, स्‍वत:ला हिरो समजता'

या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या वेळी शरद पवार आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती ठरविणार आहेत. श्री. पवार यांच्या या दौऱ्यातून कार्यकर्त्यांना चार्ज केले जाणार आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत निर्माण झालेला राष्ट्रवादीअंतर्गत नेत्यांचा नाराजीचा तिढाही ते सोडविणार आहेत. कदाचित सर्वसमावेशक पॅनेलचे अंतिम उमेदवारही तेच ठरवून जातील. त्यामुळे श्री. पवार यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar
निवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी; आमदार पाटलांसह राजपुरे, खर्डेकर बिनविरोध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com