राष्ट्रवादीला 'चिठ्ठी'चा दणका; शिवसेनेचे शेखर गोरे विजयी, आमदार गोरेंच्या मतांना भगदाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Shekhar Gore

माण सोसायटी मतदारसंघातून आमदार जयकुमार गोरे, शिवसेनेचे शेखर गोरे व राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांनी उमेदवारी अर्ज भरले होते.

राष्ट्रवादीला 'चिठ्ठी'चा दणका; शिवसेनेचे शेखर गोरे विजयी

दहिवडी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara District Bank Election) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माण सोसायटी मतदारसंघातून शिवसेनेच्या शेखर गोरे (Shivsena leader Shekhar Gore) यांनी सर्वसमावेशक सहकार पॅनेलचे उमेदवार मनोज सदाशिवराव पोळ (Manoj Sadashivrao Pol) यांना पराभूत केले आहे. दोघांनाही प्रत्येकी छत्तीस मते मिळाल्यामुळे चिठ्ठी टाकण्यात आली. चिठ्ठीचा कौल शेखर गोरे यांना मिळाला.

माण सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आमदार जयकुमार गोरे, शिवसेनेचे शेखर गोरे व राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. जवळपास वर्षभरापूर्वीच मनोज पोळ यांनी जिल्हा बॅंकेची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी लोधवडे येथे मतदार व कार्यकर्त्यांची बैठक घेवून मनोज पोळ यांची उमेदवारी जाहीर केली होती. तर कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँकेत संचालक म्हणून जायचेच असा निर्धार करुन निवडणुकीची तयारी केली होती. आमदार गोरे हे निवडणुकीच्या मैदानात असणारच याबद्दल कोणालाही शंका नव्हती. पण, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेवून आमदार गोरे यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पण, त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत वाढली. शेखर गोरे यांनी तन, मन, धन अपूर्ण तसेच साम, दाम, दंड वापरुन मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. संचालक बनण्याचा त्यांनी विडाच उचलला होता.

हेही वाचा: माजी आमदाराकडून अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव

तर दुसरीकडे मनोज पोळ हे राष्ट्रवादीकडे असलेल्या वीसपेक्षा कमी मतांच्या पाठबळावर निवडणुकीला सामोरे जात होते. यात त्यांना अनिल देसाई यांच्या दोन मतांची मदत मिळणार होती. पण शेखर गोरे व मनोज पोळ या दोघांची खरी भिस्त आमदार गोरे यांच्याकडे असलेल्या मतांवर होती. मनोज पोळ यांच्याकडील मते दिवसेंदिवस कमी होत असल्याची तर शेखर गोरे यांच्याकडील मतांमध्ये वाढ झाल्याची चर्चा मतदानाच्या दिवसापर्यंत सुरू होती. आमदार गोरे नक्की कोणाला साथ देतील याबद्दल सुध्दा उत्सुकता होती. दोघांकडूनही चाळीस ते बेचाळीस मते मिळतील असा दावा केला जात होता. मनोज पोळ यांना राष्ट्रवादीची १६, अनिल देसाई यांची २ व आमदार गोरे यांची २६ मते मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र आमदार गोरे समर्थक दोघे मतदानाला गैरहजर राहिले. परंतू अपेक्षित बेचाळीस पैकी फक्त ३६ मते मनोज पोळ यांना मिळाली. मात्र शेखर गोरे यांनी आमदार गोरे यांच्या मतांनाही भगदाड पाडले. शेखर गोरे यांनी एकाकी झुंज देत ३६ मतापर्यंत मजल मारुन सर्वांना आश्चर्यचकित केले.

हेही वाचा: भाजपच्या साथीनं NCP सहकारमंत्र्यांकडून 'काँग्रेस'चा करेक्ट कार्यक्रम

loading image
go to top